तरुणांमधील स्किल डेव्हलपमेंटसाठी गूगल करिअर सर्टिफिकेट प्रोग्राम लॉंच! Google | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांमधील स्किल डेव्हलपमेंटसाठी 'गूगल करिअर सर्टिफिकेट' लॉंच!
तरुणांमधील स्किल डेव्हलपमेंटसाठी गूगल करिअर सर्टिफिकेट प्रोग्राम लॉंच!

तरुणांमधील स्किल डेव्हलपमेंटसाठी 'गूगल करिअर सर्टिफिकेट' लॉंच!

सोलापूर : देशभरातील तरुणांच्या कौशल्य विकासाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या गूगलने (Google)तरुणांना एक मोठी भेट दिली आहे. यानुसार, आज म्हणजेच 18 नोव्हेंबर 2021 रोजी गूगल फॉर इंडिया - 2021 (Google for India 2021) इव्हेंटच्या सातव्या आवृत्ती दरम्यान गूगल करिअर सर्टिफिकेट (Google Career Certifaicate) प्रोग्रामची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात गूगल इंडियाच्या ट्‌विटर हॅंडलवरून एक ट्‌विटही करण्यात आले आहे.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

या अभ्यासक्रमांतर्गत तरुणांना आयटी सपोर्ट, डेटा मॅनेजमेंट यांसारखे प्रोग्राम शिकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच गूगलकडून शिष्यवृत्तीही जाहीर करण्यात आली असून, येत्या दोन वर्षांत सुमारे एक लाख तरुणांना याचा लाभ होणार आहे.

Google ने NASSCOM Foundation आणि टेक महिंद्राच्या सहकार्याने डिजिटल करिअर सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे. त्याच वेळी, त्याची फी 6,000 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान असेल. Google इव्हेंटच्या सुरुवातीस उपाध्यक्ष संजय गुप्ता म्हणाले, आम्ही भारतातील पहिली कंपनी आहोत, ज्याचे मिशन करोडो लोकांसाठी उपयुक्त आणि एक देश बनवणे आहे. सध्या आपण देशासाठी एका मोठ्या वळणावर आहोत.

हेही वाचा: खासगी शाळांची घटतेय विद्यार्थीसंख्या! सरकारी शाळांना मिळतेय पसंती

संजय गुप्ता पुढे म्हणतात की, व्यावसायिक क्षेत्रात इंटरनेट खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या 12 महिन्यांत भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची सर्वात मोठी संख्या आहे, जी कोरोना महामारीच्या पूर्वीची संख्या जवळजवळ दुप्पट आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे, की भारतासाठी Google च्या सातव्या आवृत्तीचे थेट प्रवाह कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर केले गेले.

loading image
go to top