खासगी शाळांमधून घटतेय विद्यार्थीसंख्या! सरकारी शाळांना मिळतेय पसंती | Education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 school
खासगी शाळांमधून घटतेय विद्यार्थीसंख्या! सरकारी शाळांना मिळतेय पसंती

खासगी शाळांची घटतेय विद्यार्थीसंख्या! सरकारी शाळांना मिळतेय पसंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आजकाल शैक्षणिक (Education) क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असताना पाहण्यात येत आहे. पालकही आपला पाल्य सर्व क्षेत्रात पुढे असावा, अशी अपेक्षा बाळगून मोठमोठ्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये (Convent School) आपल्या पाल्याला प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करताना दिसून येतात. त्यामुळे सरकारी शाळांपेक्षा (Government schools) खासगी शाळांना पसंती दिली जाते. मात्र गेल्या तीन वर्षांत याउलट घडत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थी खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये स्थलांतरित होत असून, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि केरळमध्ये (Kerala) सरकारी शाळांमधील प्रवेशांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल (ASER) 2021 मधून ही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

हा अहवाल 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे. हे सर्वेक्षण एकूण 76,706 कुटुंबे आणि 5 ते 16 वर्षे वयोगटातील 75,234 मुलांवर करण्यात आले. बुधवारी (ता. 17) प्रसिद्ध झालेल्या ASER च्या 16व्या अहवालात म्हटले आहे की, 'अखिल भारतीय स्तरावर, खासगी शाळांकडून सरकारी शाळांमध्ये स्पष्ट बदल होत आहे. सहा ते 14 वयोगटातील मुलांसाठी खासगी शाळांमधील प्रवेशाची संख्या 2018 मध्ये 32.5 टक्‍क्‍यांवरून 2021 मध्ये 24.4 टक्‍क्‍यांवर घसरली आहे. अहवालात म्हटले आहे की, हे सर्व वर्गांमध्ये आणि मुला-मुलींमध्ये दिसून आले.

हेही वाचा: बॅंक ऑफ बडोदामध्ये B.Tech अन्‌ M.Tech पास तरुणांना नोकरीची संधी!

तथापि, अजूनही मुलींच्या तुलनेत मुले खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. 2018 मध्ये सरकारी शाळांमधील सरासरी नोंदणी 64.3 टक्के होती, जी गेल्या वर्षी 65.8 टक्के वाढून यावर्षी 70.3 टक्‍क्‍यांवर पोचली आहे. 2006 ते 2014 या वर्षात खासगी शाळांमधील प्रवेशाच्या संख्येत सातत्याने वाढ झाली. अहवालानुसार, काही वर्षे 30 टक्‍क्‍यांवर राहिल्यानंतर, कोरोना महामारीच्या वर्षांत त्यात लक्षणीय घट झाली आहे. कोविडपूर्वीही सरकारी शाळांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त होती.

loading image
go to top