करिअर वेध : दैनंदिन जीवनशैली

दैनंदिन जीवनशैलीतील चांगल्या सवयी, वेळेचे नियोजन आणि शिस्तबद्ध दिनक्रम यामुळे व्यक्तिमत्त्व घडते, करिअरमध्ये दीर्घकाळ यश मिळते आणि खेळापासून व्यवसायापर्यंत प्रत्येक क्षेत्रात ‘फिट’ राहणे शक्य होते
"तुमच्या सवयीच तुमचं भविष्य ठरवतात!" करिअरमध्ये मोठी इनिंग खेळायची असेल तर 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

"तुमच्या सवयीच तुमचं भविष्य ठरवतात!" करिअरमध्ये मोठी इनिंग खेळायची असेल तर 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

Sakal

Updated on

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

माणसाच्या आयुष्यात त्याचे चारित्र्य महत्त्वाचे असते आणि चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी योग्य सवयी असणे आवश्यक बाब आहे. आयुष्यात यशस्वी झालेल्या लोकांपैकी ९० टक्के लोकांच्या सवयी चांगल्या असतात त्यांच्या जीवनशैलीची पद्धत ठरलेली असते. त्याप्रमाणे ते गोष्टी करत असतात. ज्यांची जीवनशैली चांगल्या सवयींनी घडलेली आहे अशा लोकांचा संपूर्ण दिवस हा पूर्वनियोजित केलेला असतो. तुम्ही दिवसभर करत असलेल्या सर्व गोष्टींचे नियोजन असणे आणि ते पाळणे यामध्ये यशस्वी आयुष्याचे गुपित दडले आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरी यशाचा थेट संबंध तुमच्या जीवनशैलीशी निगडित आहे. यशस्वी होण्यासाठी जीवनशैली उत्तम असणे महत्त्वाचे आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी उत्तम सवयींची गरज आहे. आपल्या पाल्याला योग्य वयात चांगल्या सवयी लावणे यामध्ये पालकांचा फार मोठा वाटा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com