बेरोजगारीची चिंता विसरा, या 11 पैकी कोणतंही ज्ञान तुमच्याकडे असेल तर कंपन्या येतील तुमच्या मागे

बेरोजगारीची चिंता विसरा, या 11 पैकी कोणतंही ज्ञान तुमच्याकडे असेल तर कंपन्या येतील तुमच्या मागे

मुंबई : जसजसं जग बदलतंय तसतशी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिची गरज देखील वाढतेय. नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग जवळ येतंय. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधित तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक प्रमाणात केला जातोय. भारताला जगभरात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिसंबंधित संसाधने पुरवणारा महत्त्वाचा देश म्हणून मान्यता आहे. अशात लिंक्डइन ने नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये भारतातील सर्वाधिक इन डिमांड नोकरीच्या संधींबाबत माहिती दिली गेलीये. येत्या वर्षात खालील अकरापैकी कोणत्याही विषयाचं ज्ञान तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बेरोजगार राहायची गरज नाही. त्यामुळे आता बेरोजगारीची चिंता विसरा, या 11 पैकी कोणतंही ज्ञान तुमच्याकडे असेल तर कंपन्या येतील तुमच्या मागे   

1 .ब्लॉकचेन डेव्हलपर : 

ब्लॉकचेन डेव्हलपर्स हे ब्लॉकचेनचे सर्व प्रोटोकॉल तसेच डिझाईन तयार करून त्यांना अधिकाधिक सोप्या पद्धतीने कसं वापरता येईल यासाठी काम करतात. ब्लॉकचेनचा वापर विविध ऍप्स तसेच कॉन्ट्रॅक्टसाठी केला जातो. 

- कोणत्या इंडस्ट्री यासाठी तुम्हाला नोकरी देऊ शकतात : इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि आणि सर्व्हिसेस. काँम्प्यूटर सॉफ्टवेअर, इंटरनेट, फायनान्शिअल सर्व्हिसेस, हॉस्पिटल्स आणि आरोग्यसंस्था  

- कोणती कौशल्ये आपल्यात हवीत : स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, हायपरलेजर, नोड.जेएस  

- कुठे आहेत सर्वाधिक संधी : बंगळुरू, नवी दिल्ली, हैद्राबाद 

2. आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेशालिस्ट : 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेशालिस्ट हे मशीन्सना गोष्टी आत्मसात करण्यास मदत करतात. यामाध्यमातून मशीन्सना आसपासचं वातावरण समजून घेण्यास मदत होते. विविध प्रकारची माहिती आत्मसात करून नियोजित ध्येय गाठणे हा यामागील उद्देश असतो. 

- कोणत्या इंडस्ट्री यासाठी तुम्हाला नोकरी देऊ शकतात : इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि आणि सर्व्हिसेस,काँम्प्यूटर सॉफ्टवेअर, इंटरनेट, रिसर्च, शिक्षण व्यवस्थापन

- कोणती कौशल्ये आपल्यात हवीत : मशीन लर्निंग, डीप लर्निंग, टेन्सरफ्लो, पायथॉन,   

- कुठे आहेत सर्वाधिक संधी : बंगळुरू,पुणे , हैद्राबाद 

3. जावा स्क्रिप्ट डेव्हलपर : 

फ्रंट-एन्ड वेब डेव्हलपर हे वेबसाईट्स किंवा पोर्टलचा दर्शनी भाग युजर्ससाठी अधिकाधिक चांगला कसा होईल यावर लक्ष देतात. तर जावा स्क्रिप्ट डेव्हलपर हे त्यामधील लॉजिक काय असेल यावर काम करतात. फ्रंट एन्ड डेव्हलपर्सने तयार केलेले व्हिज्युअल एलिमेंट्स नीट चालवण्याची जबाबदारी जावा स्क्रिप्ट डेव्हलपर्सच्या खांद्यावर असते.  वेबसाईट डेव्हलपमेंट आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन मुख्य काम जावा स्क्रिप्ट डेव्हलपर्सची असते.  

- कोणत्या इंडस्ट्री यासाठी तुम्हाला नोकरी देऊ शकतात :  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि आणि सर्व्हिसेस. काँम्प्यूटर सॉफ्टवेअर, इंटरनेट, रिसर्च, शिक्षण व्यवस्थापन

- कोणती कौशल्ये आपल्यात हवीत : अँग्युलर JS, नोड.js, रिऍक्ट नेटिव्ह, मोंगो डीबी   

- कुठे आहेत सर्वाधिक संधी : बंगळुरू,मुंबई, हैद्राबाद 

4. रोबोटीक प्रोसेस ऑटोमेशन कन्सल्टन्ट : 

रोबोटीक प्रोसेस ऑटोमेशन कन्सल्टन्ट हे याआधी माणसांकडून केल्या जाणाऱ्या क्रिया रोबोट्स सॉफ्टवेअर्सकडून कशा प्रकारे करवून घेतल्या जाऊ शकतात यावर काम करतात. रोबोटीक प्रोसेस ऑटोमेशन कन्सल्टन्टचे काम हे संबंधित व्यवसाय कशाप्रकारे चालतोय हे समजून घेऊन त्यामध्ये ऑटोमेशन प्रोसेसची अंमलबजावणी करून त्यातून काय काय फायदे होऊ शकतात यावर काम करणे असतं. 

- कोणत्या इंडस्ट्री यासाठी तुम्हाला नोकरी देऊ शकतात :  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि आणि सर्व्हिसेस, काँम्प्यूटर सॉफ्टवेअर, इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, व्यवस्थापन सल्लामसलत,

- कोणती कौशल्ये आपल्यात हवीत : युआय पाथ (UiPath), ऑटोमेशन एनीव्हेअर, ब्लु प्रिझम, प्रोसेस ऑटोमेशन, SQL   

- कुठे आहेत सर्वाधिक संधी : बंगळुरू,मुंबई

5. बॅक एन्ड डेव्हलपर्स : 

एखादं ऍप्लिकेशन नक्की कसं काम करायला हवं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम बॅक एन्ड डेव्हलपर्सवर असते. आपण एखाद्या वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशनवर आपण ज्या छान गोष्टी पाहतो, त्या बनवण्याचे आणि योग्य प्रकारे चालतायत का हे पाहण्याचे काम बॅक एन्ड डेव्हलपर्सचं काम असतं.

- कोणत्या इंडस्ट्री यासाठी तुम्हाला नोकरी देऊ शकतात :  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि आणि सर्व्हिसेस, काँम्प्यूटर सॉफ्टवेअर, इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, फायनान्शिअल सर्व्हिसेस, इ-लार्निंग 

- कोणती कौशल्ये आपल्यात हवीत : नोड.जेएस (Node.js), मोंगो (MogoDB), जावा स्क्रिप्ट , माय एसक्यूएल (MySQL)

- कुठे आहेत सर्वाधिक संधी : बंगळुरू,मुंबई, नवी दिल्ली 

6. ग्रोथ मॅनेजर : 

एखाद्या व्यवसायाची वाढ करण्याची जबाबदारी 'ग्रोथ मॅनेजरची' असते. नवनव्या रिसर्चच्या माध्यमातून एखाद्या व्यवसायात खरेदीदार किंवा वापरकर्ते कसे येतील हे ग्रोथ मॅनेजर पाहतो. 

- कोणत्या इंडस्ट्री यासाठी तुम्हाला नोकरी देऊ शकतात :  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि आणि सर्व्हिसेस, मार्केटिंग अँड ऍडव्हरटायझिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस, फूड इंडस्ट्री 

- कोणती कौशल्ये आपल्यात हवीत : बिझनेस डेव्हलपमेंट, टीम मॅनेजमेंट, ग्रोथ स्ट्रॅटेजी, मार्केट रिसर्च, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, डिजिटल मार्केटिंग      

- कुठे आहेत सर्वाधिक संधी : बंगळुरू, गुरगाव, नोयडा 

7. साईट रियाबलिटी इंजिनिअर : 

साईट रिलायबलिटी इंजिनिअर हे विविध तांत्रिक बाबी तपासून एखादे उत्पादन किंवा सर्व्हिस सुलभपणे चालवण्याची खात्री करतात. 

- कोणत्या इंडस्ट्री यासाठी तुम्हाला नोकरी देऊ शकतात :  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि आणि सर्व्हिसेस, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, इंटरनेट, मार्केटिंग अँड ऍडव्हरटायझिंग, फायनान्शिअल सर्व्हिस, टेलिकम्युनिकेशन

- कोणती कौशल्ये आपल्यात हवीत :  अमेझॉन वेब सर्व्हिसेस,  अन्सीबल (Ansible), डॉकर प्रॉडक्ट, जेनकिन्स (Jenkins)

- कुठे आहेत सर्वाधिक संधी : बंगळुरू, पुणे,  हैद्राबाद 

8. कस्टमर सक्सेस स्पेशालिस्ट :

आपल्या ग्राहकांची खरंच गरज काय आहे हे जाणून घेणं, सोबतच आपल्या संस्थेला ग्राहकांच्या गरजा पुरवण्यास काय गोष्टी लागतील यावर कस्टमर सक्सेस स्पेशालिस्ट काम करतो. 

- कोणत्या इंडस्ट्री यासाठी तुम्हाला नोकरी देऊ शकतात : इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि आणि सर्व्हिसेस, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, इंटरनेट, मार्केटिंग अँड ऍडव्हरटायझिंग, फायनान्शिअल सर्व्हिस

- कोणती कौशल्ये आपल्यात हवीत : कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट, कस्टमर रिटेन्शन, अकाउंट मॅनेजमेंट   

- कुठे आहेत सर्वाधिक संधी : बंगळुरू, मुंबई, नवी दिल्ली 

9. फुल स्टाक इंजिनिअर :

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि फ्रंट एन्ड वेब डेव्हलपमेंटच्या साहाय्याने एखादा प्रोजेक्ट सुरवातीपासून शेवटपर्यंत चालवायचा कसा याची खात्री करतो. 

-  कोणत्या इंडस्ट्री यासाठी तुम्हाला नोकरी देऊ शकतात : इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि आणि सर्व्हिसेस, इंटरनेट, मार्केटिंग अँड ऍडव्हरटायझिंग, फायनान्शिअल सर्व्हिस

- कोणती कौशल्ये आपल्यात हवीत : अँग्युकर जे एस (AngularJS), नोड.जेएस (Node.js), जावा स्क्रिप्ट, रिऍक्ट.जेएस (React.js), मोंगोडीबी  (MongoDB)

- कुठे आहेत सर्वाधिक संधी : बंगळुरू, मुंबई, हैद्राबाद 

10. रोबोटिक इंजिनिअरिंग (सॉफ्टवेअर) :

रोबोटिक इंजिनिअर हे एखादे सॉफ्टवेअर आणि त्याच्या डिझाईनवर काम करत असतात. 

-  कोणत्या इंडस्ट्री यासाठी तुम्हाला नोकरी देऊ शकतात : इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि आणि सर्व्हिसेस, ऑटोमोटिव्ह, इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, इलेकट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक मॅनिफॅक्चरिंग 

- कोणती कौशल्ये आपल्यात हवीत :  रोबोटिक रोसेस ऑटोमेशन, युआय पाथ, ब्लु प्रिझम, ऍटोमेशन एनीव्हेअर, रोबोटिक्स, एसक्यूएल (SQL)

- कुठे आहेत सर्वाधिक संधी : बंगळुरू, गुरगाव, चेन्नई 

11. सायबर सेक्युरिटी स्पेशालिस्ट : 

सायबर सेक्युरिटी स्पेशालिस्ट यांचं प्रमुख काम हे आपली माहिती ही सुरक्षित ठेवण्याचं काम करतो. फिशिंग, सायबर हल्ले, मालवेअर, व्हायरस अटॅक आणि हॅकिंगपासून ऍप्लिकेशन्स आणि वेबसाईटला दूर ठेवण्याचं काम सायबर सेक्युरिटी स्पेशालिस्ट करतो. 

-  कोणत्या इंडस्ट्री यासाठी तुम्हाला नोकरी देऊ शकतात : इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि आणि सर्व्हिसेस, कॉम्प्युटर अँड नेटवर्क सेक्युरिटी, अकाउंटिंग, मॅनेजमेंट कन्सल्टन्ट. 

- कोणती कौशल्ये आपल्यात हवीत : सेक्युरिटी इन्फॉर्मेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट, असुरक्षितता मूल्यांकन, पेनिट्रेशन टेस्टिंग, इन्फॉर्मेशन सेक्युरिटी, नेटवर्क सेक्युरिटी  

- कुठे आहेत सर्वाधिक संधी : बंगळुरू, मुंबई, गुरगाव. 

as per linked in fastest growing 11 jobs and skill set you require

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com