esakal | एलएल.बी. सीईटीच्या अर्जासाठी २९ जुलैपर्यंत मुदत
sakal

बोलून बातमी शोधा

LLB Admission

एलएल.बी. सीईटीच्या अर्जासाठी २९ जुलैपर्यंत मुदत

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : विधी शाखेत करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एलएलबी अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्‍ध आहे. पदवी शिक्षण घेतलेल्‍या उमेदवारांकरीता तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबी शिक्षणक्रमास प्रवेशासाठी सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २९ जुलैपर्यंत आहे. (LLB-CET-Deadline-for-application-educational-marathi-news)

पदवीधारकांना विधी शाखेत प्रवेशाची संधी

सीईटी सेलतर्फे एलएलबी (तीन वर्षे) सीईटी २०२१ परीक्षेसंदर्भात सूचनापत्र जारी केले आहे. पात्रतेच्‍या अटींसह अन्‍य सविस्‍तर तपशील या सूचनापत्रात उपलब्‍ध करून दिला आहे. त्‍यानुसार पदवी अभ्यासक्रमानंतर तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबी या विधी शाखेतील अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्षाला सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे. राखीव प्रवर्गातून अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंडची प्रक्रिया सुरु होत असताना जात वैधता प्रमाणपत्र व अन्‍य आवश्‍यक प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहेत.

दीडशे गुणांची असेल परीक्षा

सीईटी परीक्षेत एकच पेपर होणार असून, या पेपरमध्ये चार विषयांशी निगडित प्रश्‍न विचारले जातील. इंग्रजी विषयाचे पन्नास प्रश्‍न, सामान्‍य ज्ञान व चालू घडामोडीविषयाचे चाळीस प्रश्‍न तर कायदे व तार्किक आकलनसंदर्भात अन्‍य दोन विषयांचे प्रत्‍येकी तीस प्रश्‍न असे एकूण दीडशे प्रश्‍न विचारले जातील. प्रत्‍येक प्रश्‍नासाठी एक गुण असेल. चुकीच्‍या उत्तरासाठी गुण कपात केली जाणार नाही.

हेही वाचा: येवल्यात दहावीचे पोरं लई हुशार! अवघ्या तालुक्यात एकच जण नापास

पाच वर्षे एलएलबीच्‍या अर्जाची मुदत मात्र अल्प

इयत्ता बारावीनंतर पाच वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. यापूर्वी गेल्‍या १२ जुलैला मुदत संपत असताना, मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. ही वाढीव मुदत मंगळवार (ता.२०) पर्यंत आहे. इच्‍छुक पात्र विद्यार्थ्यांना या मुदतीत ऑनलाइन अर्ज दाखल करताना सीईटी प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

(LLB-CET-Deadline-for-application-educational-marathi-news)

हेही वाचा: काका-आण्णा ड्रायव्हींग सिटवर! २०२४ च्या रेसची आतापासूच मोर्चेबांधणी

loading image