Money
MoneyGoogle file photo

जॉब गेलाय? काळजी नको, कोरोना काळात कमाईचे ५ पर्याय

कोरोनाच्या काळात ऑफिसेस बंद झाल्यानंतर कंपन्यांनी घरातून काम करण्याची मुभा दिली. मात्र काहींचे काम बंदच झाले. अशा लोकांसाठी अनेक संधी त्यांच्या कौशल्यानुसार उपलब्ध आहेत.
Published on
Summary

कोरोनाच्या काळात ऑफिसेस बंद झाल्यानंतर कंपन्यांनी घरातून काम करण्याची मुभा दिली. मात्र काहींचे काम बंदच झाले. अशा लोकांसाठी अनेक संधी त्यांच्या कौशल्यानुसार उपलब्ध आहेत.

गेल्या दीड वर्षापासून जगात कोरोनाने (Covid-19) हाहाकार माजवला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जवळपास सर्वच देशांना लॉकडाऊन (Lockdown) करावे लागले. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. यात लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. नोकरी (Jobs) गेल्यानं उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि यातून अनेकांना नैराश्यही (Depression) आले. याच नैराश्यात आत्महत्यांचे प्रमाणही वाढले. कोरोनाच्या या कठीण काळात नैराश्यावर मात करत यातूनही लोकांनी मार्ग काढले. नव्या वाटा शोधल्या आणि त्यात थोडं अधिक प्रमाणात यशही मिळवलं. नोकरी गेली म्हणून जिद्द सोडू नका, तुमच्याकडे असलेल्या कौशल्याच्या जोरावर तुम्ही स्वत:चं असं काही सुरु करू शकता आणि त्यातून पैसेही कमवू शकता.

कोरोनाच्या काळात ऑफिसेस बंद झाल्यानंतर कंपन्यांनी घरातून काम करण्याची मुभा दिली. मात्र काहींचे काम बंदच झाले. अशा लोकांसाठी अनेक संधी त्यांच्या कौशल्यानुसार उपलब्ध आहेत. यामध्ये ऑनलाइन आणि तुमच्या वेळेनुसार काम करता येतं.

Money
भारतीय नौदलात 2500 जागांसाठी बंपर भरती; आजच करा अर्ज
  • ऑनलाइन विक्री (Online Selling)

सध्या ऑनलाइन खरेदी विक्री जास्त होते. तुम्ही एखाद्या ई-कॉमर्स कंपनीसोबत टायअप करून त्यांच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री करू शकतात. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांचे नेटवर्क जबरदस्त असल्यानं तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.

  • फ्रीलान्सर (Freelancer, Consultant)

तुम्हाला व्यावसायिक किंवा ठराविक वेळेत काम करायचं नसेल तर फ्रीलान्सिंग आणि कन्सल्टिंग हा चांगला पर्याय आहे. सध्या फ्रीलान्सिंगचा व्यवसायसुद्धा वाढत आहे. तुमची कौशल्ये जशी असतील त्यानुसार तुम्ही काम करू शकता. यामध्ये डिझायनिंग, लेखन, ब्लॉग एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, प्रूफ रिडिंगशिवाय इतरही अनेक ऑनलाइन कामांचा समावेश आहे.

कन्सल्टंट म्हणून तुम्हाला कामाच्या अनेक संधी उपल्बध होऊ शकतात. तुम्ही एखाद्या क्षेत्रात जाणकार असाल, तर त्याबाबत सल्ला देण्याचे काम करू शकता.

Money
IGNOU : जुलै सेशनसाठी करा 15 जूनपर्यंत पुन्हा नोंदणी ! 'जून टर्मएंड'संबंधी जाणून घ्या सविस्तर
  • ब्लॉगर (Blogger)

सध्याच्या काळात ब्लॉगर्सची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या विषयावर नाविण्यपूर्ण कल्पना मांडणाऱ्या ब्लॉगर्सना चांगल्या संधी मिळत आहेत. यातून तुम्ही आर्थिक उत्पन्नही मिळवू शकता. त्यासाठी युजर्स आणि त्यांना हवा असलेला उत्तम आणि माहितीपूर्ण असा कंटेटं दिल्यास एंगेजमेंट वाढेल आणि पैसेही मिळतील.

  • मार्केटिंग (Marketing)

इतर कंपन्यांची प्रोडक्ट विकून तुम्ही पैसे कमावू शकता. कंपन्यांकडून त्यांच्या प्रोडक्टची विक्री करण्यासाठी कमिशन दिलं जातं. त्यातून तुम्ही आर्थिक उत्पन्न मिळवू शकता.

  • युट्यूब, इन्स्टाग्राम (YouTube Channel, Instagram)

आता युट्यूब चॅनेल आणि इन्स्टाग्रामसुद्धा पैसे मिळवण्याचं एक चांगलं साधन आहे. तुम्ही स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरु करू शकता. त्यामाध्यमातून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून काम करता येईल. आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

कोरोनाने सध्या अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तुमच्याकडे जर कौशल्ये असतील आणि आत्मविश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तुम्ही स्वत:ही त्यातून पैसे कमावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com