esakal | IGNOU : जुलै सेशनसाठी करा 15 जूनपर्यंत पुन्हा नोंदणी ! 'जून टर्मएंड'संबंधी जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

IGNOU

IGNOU : जुलै सेशनसाठी करा 15 जूनपर्यंत पुन्हा नोंदणी ! 'जून टर्मएंड'संबंधी जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोव्हिड-19 (Covid-19) मुळे परीक्षा व क्‍लासेस पुढे ढकलले जात असले तरी, पुढील सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार घेण्यात येत आहे. देशातील सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने जुलै 2021 च्या सत्रासाठी पुन्हा नोंदणी अर्ज जारी केले आहेत. विद्यापीठाने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार 5 मे 2021 रोजी अधिकृत पोर्टल ignou.samarth.edu.in वर जुलै 2021 साठी पुन्हा नोंदणी सुरू केली आहे. (Opportunity to re-register for IGNOU July session till fifteenth June)

15 जूनपर्यंत पुन्हा नोंदणी करता येईल

IGNOU ने पुढील सत्रासाठी पुन्हा नोंदणी अर्ज भरण्यासाठी 15 जून 2021 ची मुदत दिली आहे. जुलै 2021 मध्ये विविध यूजी, पीजी, डिप्लोमा आणि इतर अभ्यासक्रमांच्या पुढील सत्रासाठी पुन्हा नोंदणी करण्याकरिता विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी विद्यापीठाच्या पोर्टलला भेट देऊ शकतात.

हेही वाचा: NIT ने मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन कॉमन एन्ट्रन्स टेस्ट पुढे ढकलली ! जाणून घ्या अपडेट

जून टर्म एंड परीक्षेसाठी 31 मेपर्यंत सबमिट करा असाइन्मेंट

IGNOU ने जून 2021 परीक्षा "टीईई'साठी असाइन्मेंट, प्रकल्प अहवाल आदी सबमिट करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. सोमवारी, 3 मे रोजी विद्यापीठाने जारी केलेल्या नोटिसीनुसार विद्यार्थी जून 2021 टीईईसाठी असाइन्मेंट, प्रोजेक्‍ट रिपोर्ट, फिल्ड वर्क जर्नल, इंटर्नशिप प्रोजेक्‍ट 31 मे 2021 पर्यंत सादर करू शकतात. त्याचबरोबर IGNOU ने हे अहवाल सादर करण्यासाठी व ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थी https://projects.ignou.ac.in/projectjun21/ या लिंकद्वारे असाईनमेंट / रिपोर्ट अपलोड पेजला भेट देऊ शकतात.