SET Exam Result 2023 : सेट परीक्षेचा ‘अधिकृत’ निकाल अखेर जाहीर

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर
Maharashtra and Goa result of set exam is finally declared
Maharashtra and Goa result of set exam is finally declaredsakal

पुणे : महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाकडून मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत केवळ ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. परिक्षेचा हा निकाल दोन दिवस आधीच फुटला होता. त्यानंतर आता विद्यापीठाने निकाल अधिकृतरीत्या मंगळवारी जाहीर झाला.

Maharashtra and Goa result of set exam is finally declared
Pune News : सातगाव पठार पाणी प्रश्नासाठी उपोषणकर्त्यां समवेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार - शिवाजीराव आढळराव पाटील

या परीक्षेसाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून एक लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील एक लाख एक हजार २५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील सहा हजार ६७६ (म्हणजेच ६.५९ टक्के) विद्यार्थ्यांनी पात्र ठरले आहेत.

Maharashtra and Goa result of set exam is finally declared
Pune News : नगर रस्ता बीआरटी काढण्याच्या निर्णयातुन महापालिका आयुक्तांची सार्वजनिक वाहतुकीबाबतची अखेर खरी भुमिका स्पष्ट

१७ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या परीक्षेसाठी पुणे केंद्रातून १९ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १५ हजार ७०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण ७१ विषयांसाठी ही परीक्षा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com