संचारबंदी आणि इंटरनेटचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा | Education update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Internet issue

संचारबंदी आणि इंटरनेटचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण अंतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सीईटी सेलकडून (Maharashtra CET cell) पदवी, पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया (degree admissions) सुरू आहे. मात्र अमरावती आणि राज्यातील इतर काही ठिकाणी करण्यात आलेल्या संचारबंदी आणि इंटरनेटच्या बंद (curfew and internet issue) करण्यात आलेल्या सेवेमुळे ज्यांना प्रवेश नोंदणी प्रक्रियेत सहभाग होता आला नाही अशा विद्यार्थ्यांना सीईटी सेलकडून दिलासा (students relief) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: मुंबई : सराईत गुन्हेगाराने केली महिलेची हत्या; १२ दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात

यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्वच प्रवेश प्रक्रियेसाठी किमान एक ते दोन दिवस आणि काही अभ्यासक्रमांना त्या पुढील दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे यासाठी करणे आपल्या संकेतस्थळावर या मुदतवाढीचा याविषयीची अधिक माहिती www.mahacet.org वर उपलब्ध आहे.

असे आहे सुधारित वेळापत्रक

एमएआरसीएच १९ नोव्हेंबर

एमसीए २२ नोव्हेंबर

एम फार्मसी १९ नोव्हेंबर

एमटेक, एमई १९ नोव्हेंबर

हेही वाचा: खाजगी रुग्णालयांना मोफत लसीकरण करण्याची सूचना; 'हे' आहे कारण

बीएआरसीएच २० नोव्हेंबर

डीएसई २० नोव्हेंबर

डीएसपी २१ नोव्हेंबर

बी.एचएमसीटी १८ नोव्हेंबर

बीई, बीटेक २१ नोव्हेंबर

बी फार्मसी २३ नोव्हेंबर

एमबीए, एमएमएस २२ नोव्हेंबर

loading image
go to top