HSC EXAM : 'या' तारखेपासून अर्ज नोंदणी; जाणून घ्या सविस्तर माहिती | Education Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hsc exam

HSC EXAM : 'या' तारखेपासून अर्ज नोंदणी; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून (Maharashtra education board) फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान अन्य लेखी परीक्षेसाठी (HSC written exam) शुक्रवारी, 12 नोव्हेंबरपासून अर्ज भरता (Application registration) येणार आहेत. यासाठी नियमित विद्यार्थ्यांना २ डिसेंबरपर्यंत विनाशुल्क तर आणि त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.

हेही वाचा: विद्यार्थी-शिक्षकांची हजेरी महास्टुडंट ॲपवरच नोंदवा - वर्षा गायकवाड

परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.

loading image
go to top