विद्यार्थी-शिक्षकांची हजेरी महास्टुडंट ॲपवरच नोंदवा - वर्षा गायकवाड | varsha gaikwad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

varsha gaikwad

विद्यार्थी-शिक्षकांची हजेरी महास्टुडंट ॲपवरच नोंदवा - वर्षा गायकवाड

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्यातील सरकारी, अनुदानित आदी सर्व शाळांमधील (Government school) विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती (students attendance) डिजीटल पद्धतीने नोंदविण्यासाठी (Digital Registration) शालेय शिक्षण विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार यापुढे प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरी ही महास्टुडंट (MahaStudent application) या ॲपद्वारे नोंदविण्याचे आदेश आज शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (varsha gaikawad) यांनी दिले आहेत.

हेही वाचा: भायखळा प्राणी संग्रहालय : पर्यटकांमुळे BMC ने जमवला २१ लाखांचा गल्ला

ॲपद्वारे हजेरी नोंदविण्यासाठी मागील काही वर्षांत काही जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रयत्न सुरू करण्यात आले होते. त्यात चांगले यश आल्याने राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांचीही हजेरी ॲपच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती तात्काळ कळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास शिक्षणमंत्री गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ हा निर्देशांक विकसित केला असून यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पद्धतीने उपस्थिती यासाठी गुण देण्यात येणार आहेत. यादृष्टीने राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये ही उपस्थिती नोंदविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हजेरीची नोंदणी करणारे महास्टुडंट हे ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यामध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच अनुपस्थिती डिजीटल पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. या ॲपमुळे विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळ्याने ठेवण्याची तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

loading image
go to top