दहावीच्या परीक्षेसाठी उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात | SSC education update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ssc students online application

दहावीच्या परीक्षेसाठी उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्य शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra education board) सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षेसाठी (ssc written exam) विद्यार्थ्यांना गुरूवारी, 18 नोव्हेंबरपासून आपले ऑनलाईन अर्ज (online application) करता येणार आहेत. यात परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र (Registration certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (private student) तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

हेही वाचा: "एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा"

शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज हे अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरून नियमित शुल्कासह गुरूवार 18 नोव्हेंबर ते गुरूवार 9 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत.

तर माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार 10 डिसेंबर ते सोमवार 20 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज सोमवार दि. 20 डिसेंबर ते मंगळवार दि. 28 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी गुरूवार 18 नोव्हेंबर ते गुरूवार 30 डिसेंबर 2021 असा आहे.

माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार 4 जानेवारी 2021 रोजी जमा करावयाची आहे. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

loading image
go to top