"एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कर" | Pravin Darekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pravin darekar

"एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा"

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : सातारा जिल्ह्यातील मेढा येथील संतोष शिंदे (santosh shinde) या एसटी कर्मचाऱ्याचा ताणतणावामुळे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू (St employee death) झाल्याची घटना दुर्दैवी आणि चिंता करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारची (mva government) निष्क्रियता व नाकर्तेपणा अशा घटनांमधून दिसू लागला आहे. दबावतंत्राचा वापर करुन कर्मचाऱ्यांना कामावर बोलावयाच्या या पध्दतीमुळे कर्मचारी तणावाखाली येत आहेत.

हेही वाचा: मुंबई NCB ची धडाकेबाज कारवाई; वकिलाची एमडी ड्रगची फॅक्टरी उद्ध्वस्त

त्यातूनच ही दुदैर्वी घटना घडली असावी. त्यामुळे या मृत्यू प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. सरकार किती निष्पाप एसटी कर्मचा-यांचे बळी घेणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकराने आता तरी जागे व्हावे व या गंभीर घटनेची दखल घेऊन घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने सकारात्मकरित्या पूर्ण कराव्यात असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top