

District bank jobs reservation for locals maharashtra news
esakal
महाराष्ट्र सरकारने स्थानिकांना रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये (डीसीसीबी) ७० टक्के नोकऱ्या त्या जिल्ह्यातील रहिवाशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. हा निर्णय ३१ ऑक्टोबरला जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात (जीआर) नमूद करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना आपल्या जिल्ह्यातच नोकरी मिळण्याची सोय होणार असून बेरोजगारी कमी करण्यात मदत होईल.