MPSC ने जाहीर केली सहाय्यक वकील पदांची भरती! लॉ ग्रॅज्युएट्‌सना संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC ने जाहीर केली सहाय्यक वकील पदांची भरती!
MPSC ने जाहीर केली सहाय्यक वकील पदांची भरती! लॉ ग्रॅज्युएट्‌सना संधी

MPSC ने जाहीर केली सहाय्यक वकील पदांची भरती! लॉ ग्रॅज्युएट्‌सना संधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission - MPSC) सहाय्यक सरकारी वकील (Assistant Public Prosecutor) पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. MPSC ने भरती जाहिरात क्रमांक 001/2022 अंतर्गत राज्याच्या गृह विभागातील भरतीसाठी ही अधिसूचना जारी केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करावयाचा आहे, ते ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी नोंद घ्यावी की, इच्छुक उमेदवार 27 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी विहित नमुन्याद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 547 पदांची भरती केली जाणार आहे. (Maharashtra Public Service Commission will recruit Assistant Advocate posts)

या तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख : 7 जानेवारी 2022

  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2022

हेही वाचा: 'या' कारणामुळे बजावली शिक्षणाधिकाऱ्यांनी चार शिक्षकांना नोटीस!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सहाय्यक सरकारी वकील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कायद्याची पदवी असणे आवश्‍यक आहे. तर MPSC APO साठी अर्ज करणारे उमेदवार 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावेत. तसेच, सरकारी निकषांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

सहाय्यक सरकारी वकील पदांसाठी असा करा अर्ज

उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट द्यावी. त्यानंतर 'UserID Registration' वर क्‍लिक करा आणि प्रोफाइल तयार करा. त्यानंतर तुमची लॉगइन क्रेडेंन्शियल एंटर करा आणि पोस्टसाठी अर्ज करा. आता तुमच्या वैयक्तिक तपशिलांसह अर्ज भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा. फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची एक प्रत डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी शेवटी सबमिट केलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट घ्या.

ही फी असेल

सहाय्यक सरकारी वकील पदासाठी अर्ज करणाऱ्या अनारक्षित उमेदवारांना 719 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 449 रुपये भरावे लागतील.

हेही वाचा: वडिलांचं 'ते' वाक्‍यच ठरलं टर्निंग पॉइंट! अन्‌ घेतली यशस्वी झेप!

अशी असेल निवड प्रक्रिया

सहाय्यक सरकारी वकील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. त्याच वेळी या पोस्टशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top