
Maharashtra SSC& HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये घेतलेली दहावीची पुरवणी परीक्षा ३७ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी दिली असून त्यातील १३ हजार ७०९ विद्यार्थी (३६.४८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. तर, राज्यातील ७३ हजार ५५४ विद्यार्थ्यांनी बारावीची पुरवणी परीक्षा दिली आहे. त्यातील ३१ हजार ६७६ विद्यार्थी (४३.६५ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.