खेलेगा इंडिया... : क्रीडा विज्ञानाचे महत्त्व

क्रीडा विज्ञान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या खेळाशी संबंधित क्षमतेचा अंदाज, खेळाडूंच्या विशिष्ट गरजांनुसार वैयक्तिक प्रशिक्षण, खेळाडूंचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा ओळखणे आणि खेळातील दुखापती टाळणे याचे ज्ञान होय.
Hockey
HockeySakal
Summary

क्रीडा विज्ञान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या खेळाशी संबंधित क्षमतेचा अंदाज, खेळाडूंच्या विशिष्ट गरजांनुसार वैयक्तिक प्रशिक्षण, खेळाडूंचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा ओळखणे आणि खेळातील दुखापती टाळणे याचे ज्ञान होय.

- महेंद्र गोखले

मी काही महिन्यांपूर्वी एका खेळाच्या अकादमीला भेट दिली होती आणि तिथे ६ ते ९ वर्षे वयोगटातील मुले धापा टाकत आणि धडधडत असल्याचे पाहिले, प्रशिक्षक मात्र आनंदी होता आणि त्याला अभिमान वाट होता की त्याचे विद्यार्थी खूप थकलेले आणि दमलेले आहेत, परंतु मला वाटले की हे योग्य नाही. त्या वयोगटातील मुलांचे मूल्यमापन करून त्यांना खेळाची कौशल्ये शिकवण्यावर आणि प्रावीण्य मिळवण्यावर भर दिला पाहिजे. मुले अशी थकून गेली तर ती कोणतीही कौशल्ये कशी शिकू शकतील?

वरील परिस्थितीत प्रशिक्षकाला क्रीडा विज्ञानाचे योग्य ज्ञान किंवा माहिती नाही हेच दिसून येते. दुर्दैवाने अनेक क्रीडा प्रबोधिनीमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते. त्यासाठी प्रशिक्षकांना क्रीडा विज्ञानाच्या किमान मूलभूत तत्त्वांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

क्रीडा विज्ञान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या खेळाशी संबंधित क्षमतेचा अंदाज, खेळाडूंच्या विशिष्ट गरजांनुसार वैयक्तिक प्रशिक्षण, खेळाडूंचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा ओळखणे आणि खेळातील दुखापती टाळणे याचे ज्ञान होय. स्पोर्ट सायन्सचा हे मुख्यतः विज्ञानाचा खेळाच्या हालचालींशी असलेल्या संबंधाचा अभ्यास करते. क्रीडा विज्ञानाचा मुख्य उद्देश हा आहे की एखाद्या खेळाडूला आपली खेळाची क्षमता कशी वाढवता येईल आणि त्याच बरोबर दुखापतीचा धोका कसा टाळता येईल.

दुखापतीचा धोका कमी करताना इव्हेंट आणि स्पर्धांच्या तयारीमध्ये कामगिरी आणि सहनशक्ती वाढवणे हे क्रीडा विज्ञानाचे केंद्र आहे. याचा उपयोग सामर्थ्य आणि कमकुवतपणा ओळखण्यात मदत करण्यासाठी केला जातो जेणेकरून सर्व स्तरातील लोकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करता येतो.

क्रीडा विज्ञान आणि त्याच्याशी संबंधित वैज्ञानिक क्षेत्रांमधील संशोधन असे सांगते की अनेक वेळा सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी कार्यक्षमता वाढवणे शक्य असते परंतु विज्ञान आणि सध्याचे दिले जाणारे क्रीडा प्रशिक्षण यांच्यात खूपच तफावत आहे. उपलब्ध असलेले ज्ञान, त्याचा खेळाडूंसाठी उपयोग, निरीक्षण आणि नवीन कल्पना यांचे यांची योग्य सांगड घालणे, खेळाडूंच्या काही समस्यांसाठी योग्य वेळी योग्य उपाय शोधणे ही कला आहे आणि हे ही प्रशिक्षकाला आव्हानात्मक असते.

क्रीडा विज्ञान अशा प्रकारच्या आव्हानांना आणि त्यात समाविष्ट असणाऱ्या खेळाडूंना किंवा इतर व्यक्तींना योग्य मार्ग दाखवण्याचे काम करते. क्रीडा जगताशी संबंधित व्यक्तीच्या क्षमतेचा अंदाज घेणे, त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना किंवा बांधणी करणे आणि सामर्थ्य, कमकुवतपणा ओळखणे आणि भविष्यातील दुखापती टाळणे अशा अनेक आघाड्यांवर क्रीडा विज्ञानाची महत्त्वाची भूमिका पार पडते.

क्रीडा विज्ञान, ऑफ सीझन, प्री-सीझन आणि स्पर्धा सीझनच्या दरम्यान ॲथलीट्सच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने मूल्यमापन करण्यावर भर देते. अशा मूल्यमापनाशिवाय प्रशिक्षण देणे खेळाडूंसाठी धोकादायक असू शकते. व्हॉल्यूम, तीव्रता, कालावधी आणि प्रगती यासारखे महत्त्वाचे घटक केवळ वैयक्तिक मूल्यमापनाच्या आधारावर ठरवता येतात. फिटनेससाठी आवश्यक घटक ज्यांवर लक्ष केंद्रित केले जाते त्यामध्ये एरोबिक क्षमता, अॅनारोबिक क्षमता, स्नायू शक्ती, सामर्थ्य, सहनशक्ती, चपळता आणि वेग या गोष्टींचा समावेश होतो. खेळाच्या विशिष्ट चाचण्या वापरल्या जातात, कमतरता ओळखली जाते, आणि त्यावर कामही केले जाते, फिटनेस क्षमतेचे मापन केले जाते आणि रिकव्हरीचे तंत्र शिकवले जाते. अशा मूल्यमापनावर आधारित खेळाडूसाठी वैयक्तिक प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला जातो. फिटनेसची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी फॉलोअप सत्रांची मात्र अत्यंत आवश्यकता असते.

  • शारीरिक रचना

  • एरोबिक क्षमता

  • लवचिकता

  • एनोरोबिक क्षमता

  • स्नायूंची क्षमता

  • स्नायूंचा असमतोल

  • स्नायूंचे सामर्थ्य

  • समतोल आणि समन्वय

  • चपळता

  • खेळानुरूप मूल्यमापन

  • वेगाची चाचणी

वरील घटकांचे मूल्यमापन करण्यासाठी व उत्तम कामगिरी करण्यासाठी क्रीडा शास्त्रात तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. स्ट्रेंग्थ आणि कंडिशनिंग या विषयातील तज्ज्ञ खेळाडूंचे शारीरिक आणि मानसिक बळ वाढवण्यात आणि त्याची कामगिरी उत्तम होण्यात खूप मोलाची भूमिका पार पडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com