खेलेगा इंडिया... : क्रीडा क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण संधी

मागील लेखात आपण क्रीडा क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. यामधील आणखी काही संधींची माहिती आजच्या लेखात घेणार आहोत.
SPORTS
SPORTSSakal
Summary

मागील लेखात आपण क्रीडा क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. यामधील आणखी काही संधींची माहिती आजच्या लेखात घेणार आहोत.

- महेंद्र गोखले

मागील लेखात आपण क्रीडा क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. यामधील आणखी काही संधींची माहिती आजच्या लेखात घेणार आहोत.

क्रीडा आणि फिटनेस आहारतज्ज्ञ

क्रीडा आहारतज्ज्ञ खेळाडूंना पौष्टिक आहाराबद्दल सल्ला देतात ज्यामुळे त्यांना मैदानावर उत्तम कामगिरी करण्यास मदत होईल. या क्षेत्रातील व्यावसायिकाने खेळाडूंनी त्यांच्या आहारात कोणते पोषक तत्त्व समाविष्ट केले पाहिजेत आणि त्यांना सर्वांत जास्त फायदा होईल अशा पदार्थांची माहिती देणे अपेक्षित असते. पोषक तत्त्वांच्या सखोल ज्ञानाबरोबरच, त्यांना क्रीडा कामगिरी, विविध खेळांच्या गरजा आणि त्यांच्या क्लायंटचा वैद्यकीय इतिहास याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. एक महत्वाकांक्षी आहारतज्ज्ञ आहार किंवा स्वास्थ्य संबंधित क्षेत्रात पदवी असणे आवश्यक आहे.

क्रीडा पत्रकार

क्रीडा पत्रकार खेळाची माहिती गोळा करतात आणि क्रीडा विश्वात घडणाऱ्या नवीन घडामोडींची माहिती देतात. खेळाडू म्हणून पार्श्वभूमी, अॅथलीट म्हणून प्रथम अनुभव, तुम्हाला या प्रकारच्या नोकरीमध्ये महत्त्वाचा ठरू शकतो. क्रीडा पत्रकारिता किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी आवश्यक आहे

क्रीडा समालोचक

क्रीडा समालोचक ही अशी व्यक्ती आहे जी रेडिओ, टेलिव्हिजन आणि इंटरनेट ब्रॉडकास्ट आउटलेटवर खेळाचे, मैदानाचे वर्णनात्मक समालोचनासह संपूर्ण सामन्याचे चित्र रंगवते. खेळाचे विस्तृत ज्ञान आवश्यक असल्याने, आपण अनेकदा निवृत्त खेळाडू आणि प्रशिक्षक हे काम करताना पाहतो. उत्तम संवाद, पत्रकारिता आणि रेडिओची पदवी असलेली कोणीही व्यक्ती या पदासाठी पात्र आहे.

पंच आणि सामना अधिकारी

सामना आवश्यक त्या पातळीप्रमाणे खेळला जातो आहे ना हे पाहणे, खेळाडू खेळाच्या सगळ्या संकेतांचे आणि नियमांचे पालन करतात याची खात्री करणे, हे अंपायरचे कार्य आहे. शिवाय, ते पार पडताना अॅथलीट जिंकण्यासाठी कोणत्याही गैरप्रकारांचा अवलंब करत नाहीत याची खात्री करणे ही देखील त्यांची जबाबदारी असते. बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल, क्रिकेट, गोल्फ या खेळांचे अंपायरिंग करणे किंवा त्यांचा सामना अधिकारी होणे हे एक व्यावसायिक काम आहे. त्यासाठी या खेळांच्या आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या अधिकाऱ्यांसाठी परीक्षा असतात.

क्रीडा प्रतिनिधी

क्रीडा प्रतिनिधी हे त्यांच्या ग्राहकांच्या वतीने प्रायोजकत्व, जनसंपर्क, आर्थिक नियोजन आणि वेगवेगळे करार हाताळतात. ते अत्यावश्यक नसले तरी कायद्याची पदवी हा या व्यवसायात येण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे कारण वेगवेगळे करार करत असताना कायदेशीर पाया आवश्यक आहे.

क्रीडा छायाचित्रकार

क्रीडा छायाचित्रकार हा खेळाचा इव्हेंट, त्यातील संघ किंवा खेळाडूंची छायाचित्रे आणि व्हिडिओ घेतो; तुम्ही एका विशिष्ट टीमसोबत काम करू शकता किंवा फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून काम करू शकता. काही मासिके, वर्तमानपत्रे, वेबसाइट्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी तुमचे फोटो, व्हिडिओ देऊ शकता. प्लेसमेंट दरम्यान पत्रकारिता, छायाचित्रण किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी तुमच्यासाठी वरदान ठरेल. अनेक टीव्ही चॅनेल्स, किंवा वेब सिरीज करणाऱ्या संस्था, इत्यादी ब्रॉडकास्टर्सना विशिष्ट स्पोर्ट्स व्हिडिओग्राफरची आवश्यकता असते.

क्रीडा कायदेतज्ज्ञ

क्रीडा कायदेतज्ज्ञ त्यांच्या क्लायंटच्या कायदेशीर बाबींची काळजी घेतात वेगवेगळ्या कराराच्या संदर्भात आणि त्यांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांच्या कामाचे आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे करार सुरक्षित करणे आणि त्याचा अर्थ लावणे, त्यांच्या कृतींचे कायदेशीर परिणाम समजावणे, मानधन ठरवणे, प्रायोजकत्व स्वीकारण्याबाबत सल्ला देणे इत्यादी विविध जबाबदाऱ्यांसाठी अशा तज्ज्ञांची गरज असते. या कामासाठी तुमच्याकडे कायद्याची पदवी असणे अनिवार्य आहे.

क्रीडा क्युरेटर

जगभरातील क्रीडा क्षेत्रे म्हणून पूर्णपणे नवीन आणि सर्वात मागणी असलेला असा वेगळा व्यवसाय आहे. खेळासाठी आवश्यक असणारी माती, चिखल, गवत लागवड, खते, पर्यावरणाचा अभ्यास हे ज्ञान आवश्यक असते. बहुतेक सगळ्या गोल्फ कोर्स, क्रिकेटची मैदाने आणि फुटबॉलची मैदाने या ठिकाणी असे व्यावसायिक काम करतात. कृषी क्षेत्रातील पदवी किंवा टर्फ तंत्रज्ञानाचा पदवी अभ्यासक्रम या कामासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com