खेलेगा इंडिया... : क्रीडा क्षेत्र खुणावतंय..!

क्रीडा विश्वाकडे पाहिल्यास, खेळाडू या पलीकडे खूपच थोडे व्यवसाय आपले लक्ष वेधून घेतात. परंतु तरीही खेळाशी संबंधित नोकऱ्यांचे विस्तीर्ण क्षितिज खेळापुरतेच मर्यादित नाही.
Sports
SportsSakal
Summary

क्रीडा विश्वाकडे पाहिल्यास, खेळाडू या पलीकडे खूपच थोडे व्यवसाय आपले लक्ष वेधून घेतात. परंतु तरीही खेळाशी संबंधित नोकऱ्यांचे विस्तीर्ण क्षितिज खेळापुरतेच मर्यादित नाही.

- महेंद्र गोखले

क्रीडा विश्वाकडे पाहिल्यास, खेळाडू या पलीकडे खूपच थोडे व्यवसाय आपले लक्ष वेधून घेतात. परंतु तरीही खेळाशी संबंधित नोकऱ्यांचे विस्तीर्ण क्षितिज खेळापुरतेच मर्यादित नाही. या क्षेत्रात करिअरच्या संधी वेगाने वाढत आहेत. सर्वच क्रीडापटू सर्वोच्च स्थानाला पोहोचू शकत नाहीत, पण म्हणून त्यांना त्यांचा खेळ सुरू ठेवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही किंवा त्याचा अभ्यास करण्यापासून रोखू शकत नाही. जागतिक स्तरावर २०२४ पर्यंत हा व्यवसाय १०० हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहेत. अभूतपूर्व वाढीमुळे अनेक संधी आहेत त्यामुळे या उद्योगातील करिअरचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. या क्षेत्रातल्या करिअरच्या विविध शक्यतांची माहिती घेऊ आणि कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते पाहू या.

फिटनेस प्रशिक्षक

फिटनेस प्रशिक्षक एखाद्या खेळाडूच्या कामगिरीत वाढ करण्यावर काम करतात आणि स्पर्धात्मक खेळ खेळण्यासाठी खेळाडूंच्या शरीरावर मेहनत घेतात. ते खेळाडूंच्या खेळाच्या गरजेनुसार तयार केलेले व्यायामाचे वेळापत्रक डिझाइन करतात. दुखापती टाळण्यासाठी फिजिओथेरपिस्ट बरोबर काम करतात आणि रिकव्हरी कार्यक्रमावरही लक्ष केंद्रित करतात. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोर्सचे सर्टिफिकेट किंवा या क्षेत्रातील पदवी, द्विपदवीधर असणे फायदेशीर ठरू शकते.

क्रीडा फिजिओथेरपिस्ट

शारीरिक थेरपिस्ट त्यांच्या क्लायंटला मालिश, व्यायाम आणि इतर प्रशिक्षण पद्धतींनी दुखापती आणि इतर कमतरतांवर मात करण्यास मदत करतात. रिकव्हरी व्यतिरिक्त, ते भविष्यातील कोणत्याही दुखापती टाळण्यासाठी देखील मदत करतात. फिजिओथेरपिस्टवर ॲथलिटचे प्रोटोकॉल रेकॉर्ड राखण्याची जबाबदार असते. ॲथलिट्ससाठी अशा पद्धतीचे काम करणे म्हणजे एक विशेष जबाबदारी असते. स्पोर्ट्स थेरपीमध्ये डिप्लोमा ही किमान आवश्यकता आहे. फिजिओथेरपीमध्ये बॅचलर पदवी, क्रीडा क्षेत्रातील उच्च कामगिरीसाठी पदव्युत्तर पदवीला प्राधान्य दिले जाते.

क्रीडा प्रशिक्षक

नावातच सगळे आले. क्रीडा प्रशिक्षक खेळाडूंना व्यावसायिक स्तरावर सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण देतात आणि त्यांना खेळाची सविस्तर माहिती देतात. खेळाडूंचे विविध स्तर आणि गट आहेत ज्यामध्ये खेळाडू सहभागी होऊ शकतो. अगदी आंतरशालेय पासून ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संघांपर्यंत. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी, तुम्ही स्पोर्ट््‌स कोचिंग, स्पोर्ट््‌स मॅनेजमेंट आणि स्पोर्ट््‌स सायन्समध्ये पदवी मिळवू शकता. तथापि, एका पदवीपेक्षाही जास्त,तुमचा या क्षेत्रातील अनुभव आणि खेळाचे संपूर्ण ज्ञान हे महत्त्वाचे ठरते. जोपर्यंत तुम्हाला खेळाची प्रत्येक युक्ती किंवा मेख माहीत नसेल तोपर्यंत तुम्ही तो खेळ शिकवू शकत नाही.

मार्केटिंग आणि जाहिरात समन्वयक

मार्केटिंग आणि प्रमोशन कोऑर्डिनेटरच्या नोकरीमध्ये अहवाल तयार करणे, मार्केटचे विश्लेषण करणे आणि मार्केटिंग धोरणांची अंमलबजावणी करणे याचा समावेश असतो. या नोकरीसाठी मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा डिजिटल आणि ऑन-ग्राउंड मार्केटिंगमधील कामाचा अनुभव आवश्यक आहे.

क्रीडा डॉक्टर

कोणत्याही प्रकारचे रोग, आजार, आरोग्य, अस्वस्थता यासाठी खेळाडूंवर उपचार करणे ही डॉक्टरांची जबाबदारी आहे तसेच औषधे लिहून देणे आणि WADA डोपिंग नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. खेळाडूंच्या तब्येतीची आणि पूर्वीच्या आजाराची माहिती असणे आणि त्याच्या आणि इतर आजारांच्या लक्षणांच्या नोंदी ठेवणे तसेच नेहमीच्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त, खेळाडूंना एखाद्या कृतीच्या, डाएटच्या प्रक्रिया, परिणाम, प्रतिबंध इत्यादींबद्दल सर्व माहिती देणे देखील अपेक्षित आहे. त्यासाठी वैद्यकशास्त्रातील पदवी आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com