Medical Admission : वैद्यकीय प्रवेशाला सोमवारपासून सुरवात; पहिल्या फेरीची अंतिम निवड यादी जाहीर

९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत समुपदेशनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू होईल
medical admission
medical admissionesakal

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पहिली निवड यादी रविवारी (ता.३०) जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट युजी) साठी घेण्यात आलेल्या समुपदेशनाच्या पहिल्या फेरीची ही अंतिम निवड यादी आहे.

वैद्यकीय समुपदेशन समितीच्या mcc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी थेट या संकेतस्थळावरून जागा वाटप देखील तपासू शकतात. ज्या उमेदवारांना नीट युजीच्या पहिल्या टप्प्यात जागा वाटप करण्यात आल्या आहेत ते उमेदवार आज पासून आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतील. तसेच ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत वाटप केलेल्या संस्थेत उमेदवारांनी त्यांची सीट कन्फर्म करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

या यादीनुसार देशभरातील वैद्यकीय महाविद्यायांमध्ये १५ टक्के राखीव कोट्याअंतर्गत प्रवेश दिला जातो. ४ ऑगस्टपर्यंत समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर समितीलाला पाच ते सहा ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचा डेटा शेअर करावा लागेल. ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत समुपदेशनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com