esakal | संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी, 10-12 वी पास असणारेही करु शकतात अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Job

संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी, 10-12वी पासही करु शकतात अर्ज

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Ministry of Defence Recruitment 2021 : संरक्षण मंत्रालयात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदरांसाठी आनंदाची बातमी आहे. येथील विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, दहावी आणि बारावी पास असणाऱ्या उमदवारांना अर्ज करता येऊ शकतो. संरक्षण मंत्रालयामार्फत येमाऱ्या विविध विभागांमधील नोकरीचं नोटेफिकेशन जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या केसी/ओ 56, एपीओसाठी 41 फील्ड अॅम्युनेशन डेपोमध्ये एकूण 458 पदांवर भरती केली जाणार आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

ट्रेड्समॅन मेट - 330 जागा

एमटीएस - 11 जागा

जीओए - 20 जागा

Material Assistant (MA) - 19 जागा

फायरमन - 64 जागा

255 (I) ABOU ट्रेड्समॅन मेट - 14 जागा

हेही वाचा: UPSC कडून अधिसूचना; प्राचार्यांच्या ३६३ जागांसाठी भरती

नोकरीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं वय कमीतकमी 18 वर्ष तर जास्तीत जास्त 25 वर्ष असणं गरजेचं आहे. आरक्षित प्रवर्गासाठी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना संरक्षण विभागाच्या अधिकृत indianarmy.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्याआधी नोकर भरतीसाठीचे नोटिफिकेशन संपूर्ण वाचून घेणं गरजेचं आहे. अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांचीही माहिती त्यात देण्यात आली आहे. ही कागदपत्र अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीनं पोस्टाच्या माध्यमातून पाठवावी लागणार आहेत.

हेही वाचा: केंद्रीय मंत्री भागवत कराडांची पंकजा मुंडेंविषयी पहिली प्रतिक्रिया

संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या विविध विभागांमध्ये भरतीसाठीची जाहिरात 10 जुलै 2021 ते 16 जुलै 2021 या दरम्यान विविध वृत्तपत्रांमध्येही प्रकाशित करण्यात येत आहे. इच्छुकांना 30 जुलै 2021 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज पोस्टानं पाठवताना ते कमांडेंट, 41 फील्ड अॅम्यूनिशेन डेपो, पिन-909741 या पत्तावर पाठवावं लागणार आहे. स्पीड पोस्ट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

loading image