MPSC Group C Mains Exam 2023 : गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ ’अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

आयोगाकडून मुदतवाढीचे पत्रक प्रसिध्द करण्यात आले
MPSC Group C Mains Exam 2023
MPSC Group C Mains Exam 2023sakal

पुणे : राज्यभरात सध्या मराठा आरक्षणासाठी आंदोलने चालू आहे. याच दरम्यान बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास शुक्रवार (ता.३) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयोगाकडून मुदतवाढीचे पत्रक प्रसिध्द करण्यात आले असले, तरी त्यामध्ये प्रशासकीय कारण देण्यात आले आहे. अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्याने पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेणे तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये परीक्षा शुल्क भरण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या तारखेनंतर शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही. तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com