दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, मिळणार सव्वा लाखापर्यंत पगार | Government Job | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government Job

दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, मिळणार सव्वा लाखापर्यंत पगार

देशासह महाराष्ट्रात बेरोजगारी खुप मोठी समस्या आहे. महाराष्ट्रात रोजगार वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दहावी पास उमेदवारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आलीय. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व जिल्ह्यांसाठी ही भरती सुरू आहे. १२ मे २०२२ पर्यंत तुम्ही https://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकता. (mpsc has provided employment opportunities for 10th pass check how to apply)

हेही वाचा: 'या’ उपक्रमांतर्गत बेरोजगारांची होणार मोठी कमाई, ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात

रिक्त पदांचा तपशील : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उच्च श्रेणी स्टेनोग्राफरच्या ३२ जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

पात्रता: या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

निवड प्रक्रिया: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या पदांसाठी उमेदवारांची निवड त्यांच्या परीक्षेतील गुणांद्वारे केली जाईल.

हेही वाचा: ISRO Recruitment 2022: इस्रोमध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

अर्जाची तारीख: इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी १२ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

अर्ज प्रक्रिया: तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.

अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/

वेतन: 41,800 - 1,32300/-प्रति महिना

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

Web Title: Mpsc Has Provided Employment Opportunities For 10th Pass Check How To Apply

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top