IIT मध्ये मिळणार एमबीएचे जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम | Washington university | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IIT Bombay

IIT मध्ये मिळणार एमबीएचे जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम

मुंबई : आयआयटी मुंबईमध्ये (Mumbai IIT) आता जागतिक दर्जाच्या एमबीए अभ्यासक्रमाचे (MBA Syllabus) शिक्षण उपलब्ध (Education) होणार आहे. यासाठी आयआयटी मुंबईतील डॉ शैलेश मेहता (Dr shailesh mehta) स्कूल ऑफ मॅनेजमेंटकडून (school of management) वॉशिंगटन विद्यापीठसोबत (Washington university) करार झाला असून या दोन्ही संस्था एकत्र मिळून आयआयटी मुंबईमध्ये एमबीएचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहेत.

हेही वाचा: मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका वाढला ; 7 दिवसांत रुग्ण संख्या दुप्पट

मुंबईसहआणि देशातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे एमबीए अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यास परदेशात जावे लागत होते मात्र आता त्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि सुविधा देणारे अभ्यासक्रम आयआयटी मुंबईच्या मेहेता स्कूलमध्ये मिळणार आहे. सोमवारी आयआयटी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. असून यावेळी डॉ शैलेश मेहेता, कल्पना मेहेता, आयआयटीचे संचालक सुभाशीस चौधरी यांच्यासह वाशिंगटन विद्यापीठाचे अधिकारी, प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

यावेळी शैलेश मेहेता म्हणाले की, आज आम्ही जागतिक दर्जाचे सुविधासह जॉइंट एक्झिकेटिव्ह एमबीए शाखेचे शिक्षण उपलब्ध करुन देत आहोत. या स्कूलमध्ये तुम्हाला चांगल्या सुविधा आणि भविष्यात आपल्या क्षेत्राचे नेतृत्व करण्याची कला, क्षमता तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे चांगल्या दर्जाचे विद्यार्थी आम्ही घडविण्याचा संकल्प यावेळी केले असल्याचे मेहेता यावेळी म्हणाले.

loading image
go to top