esakal | आयटीआय प्रवेशाच्या अर्जाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

 ITI

आयटीआय प्रवेशाच्या अर्जाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (ITI) अंतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय, आणि खासगी आयटीआयमधील (Private ITI) विविध ट्रेडच्या प्रवेशासाठी (ITI Admissions) करण्यात आलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी (ITI list) आज सायंकाळी जाहीर झाली.

यात अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची त्यांच्या प्रवर्गनिहाय यादी ठरविण्यात आली आहे. तर ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयटीआय प्रवेशाच्या पहिल्या फेरीची निवड व ट्रेड निहाय प्रवेशाचे ॲलॉटमेंट जाहीर होणार असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली. अर्जांच्या गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनवर गुणवत्ता क्रमांक कळविण्यात आला असून तसेच त्यासाठीचा एसएमएसही पाठविण्यात आल्याची माहीती संचालनालयाकडून देण्यात आली.

हेही वाचा: डोंबिवलीत रघुराम सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर आग; जीवितहानी नाही

या यादीत जे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले त्यातील प्रथम फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, त्यानंतर या विद्यार्थ्यांनी ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत निवड झालेल्या संस्थेत आपल्या मूळ कागदपत्रासह जाऊन प्रवेश करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना यादरम्यान प्रवेशाचा अर्ज करता आला नाही, त्यांच्यासाठीही वेगळी फेरी आयोजित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

अर्जांप्रमाणे अंतिम गुणवत्ता यादी. विद्यार्थ्यांची संख्या

राज्यस्तरावरील सामान्य यादी - १७८८७७

राज्यस्तरावरील प्रवर्गानुसार यादी - ३४५७८

जिल्‍हा स्तरावरील सामान्य यादी - ७८५५

जिल्हा स्तरावरील प्रवर्गानुसार यादी - १४०७

loading image
go to top