esakal | मुंबई विद्यापीठाला नॅककडून सात वर्षांसाठी मुदतवाढ | Mumbai university
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-University

मुंबई विद्यापीठाला नॅककडून सात वर्षांसाठी मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाला (Mumbai university) नॅककडून (Naac) सात वर्षांसाठी मान्यतेची मुदतवाढ (Grant extension) मिळाली आहे. मूल्यांकनानंतर सर्वसाधारणपणे ही मुदत पाच वर्षांची (five years) असते; मात्र मूल्यांकनात सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त केल्याने मुंबई विद्यापीठास (Mumbai university) सात वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. नुकतेच विद्यापीठाला नॅककडून अ++ श्रेणीसह ३.६५ एवढे सर्वाधिक गुणांकन मिळाले आहे.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाला मिळणार पूर्ण वेळ कुलसचिव

विद्यापीठास २००१ ला ‘फाईव्ह स्टार’ (सर्वाधिक श्रेणी) त्यानंतर २०१२ ला ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली होती. याच निकषांवर तिसऱ्यांदा सर्वाधिक गुणांकनासह अ++ श्रेणी प्राप्त झाल्याने पाच वर्षांऐवजी सात वर्षांसाठी मान्यतेची मुदतवाढ विद्यापीठाला मिळाली आहे. यानुसार आता मुंबई विद्यापीठाकडे २०२८ पर्यंत नॅकचा अ++ दर्जा असणार आहे.

दरम्यान, नॅककडून सर्वाधिक गुण मिळवणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठाने विविध विद्याशाखांतर्गत दिलेले भरीव योगदान, संशोधनवृतीला चालना, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थी विकास अशा सर्व बाबतीत विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. दरम्यान, सात वर्षांसाठीची मुदतवाढ ही खूप मोठी जमेची बाब असून हा विद्यापीठास प्राप्त झालेला बहुमान असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

हेही वाचा: बिग बींनी 'चेहरे'चं मानधन नाकारलं; निर्मात्यांनी सांगितलं कारण

प्रथम श्रेणीतील संशोधन विद्यापीठ ठरणार
पाच वर्षांऐवजी सात वर्षांच्या मुदतवाढीमुळे विद्यापीठ आता ग्रेड वन ऑटोनॉमी तसेच युनिव्हर्सिटी विथ एक्सलेंसला पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रथम श्रेणीतील ‘संशोधन विद्यापीठ’ म्हणूनही विद्यापीठाचे स्थान अधोरेखित होणार असल्याचे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

loading image
go to top