मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट

mumbai university
mumbai universitysakal media

मुंबई : दक्षिण अफ्रिकेतून (south Africa) आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन (corona omicron variant) या नव्या व्हेरियंटचे मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) दीक्षांत सोहळ्यावर (Dikshant sohala) सावट निर्माण झाले आहे. हा सोहळा येत्या १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडणार असून त्यात कमीत कमी विद्यार्थी, शिक्षक यांची उपस्थिती (teachers attendance) ठेवण्यासाठी विद्यापीठाकडून तयारी केली जात असल्याचे सांगण्यात येते.

मागील वर्षी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने पार पडला होता. यावेळी विद्यापीठाने ऑफलाईन आणि मोठ्या थाटामाटात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच या सोहळ्याला राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी हे या दीक्षांत सोहळ्यात अध्‍यक्षस्थानी असणार आहे. राज्यपालांसोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून त्यासाठीचे निमंत्रणही मान्यवरांना देण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडणार असला तरी त्यासाठी लवाजमा आणि इतर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. मात्र कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे या कार्यक्रमाला मोठी गर्दी करता येणार नाही. यामुळे मोजक्याच विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्या पदवीदानाचा कार्यक्रम करता येईल काय, असाही विचार विद्यापीठाकडून केला जात असल्याचे सांगण्यात येते.

दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी

२०२० चा मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समांरभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न झाला होता. या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९१,४९५ विद्यार्थ्यांना पदवी,पदविका प्रदान करण्यात आल्या. यावर्षी २ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पदवी प्राप्त करण्यात येणार असून त्यातील मोजक्याच विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.

"कोरेानासंदर्भात सध्या सरकारने आणि आरोग्य विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच दीक्षांत सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आणि त्याचा धोका लक्षात घेऊन हा सोहळा कमीकमी उपस्थितीत करण्याचा विचार आहे. मात्र सोहळ्यापर्यंत काही परिस्थिती बदलल्यास ऐनवेळी काही बदलही करता येतील."

- डॉ. सुधीर पुराणिक, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com