चहा विक्रेत्याच्या मुलानं मीडियापासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच बनवलं 'मूर्ख'

Rahul Kumar Das
Rahul Kumar Dasesakal
Summary

एका 'मुन्नाभाई'नं मीडियापासून राजकारण्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच मूर्ख बनवलंय.

नवी दिल्ली : आसाममध्ये (Assam) गेल्या काही दिवसांपासून एक किस्सा चांगलाच गाजत आहे. मात्र, गाजत असलेला 'तो' किस्सा खोटा असल्याचं आता समोर आलंय. आसाममधील एका 'मुन्नाभाई'नं मीडियापासून राजकारण्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच मूर्ख बनवलंय. गेल्या आठवडाभरापासून 24 वर्षांचा राहुल कुमार दास (Rahul Kumar Das) चर्चेत राहिला आहे. राहुल हा पाथाचरकुची येथील रहिवासी आहे. एका गरीब चहा विक्रेत्याचा मुलगा सोशल मीडियावर चांगलाच 'ट्रेंड' करत होता. त्याचं कारणही तसंच होतं. राहुलनं एकाच वेळी NEET पास केलं आणि प्रतिष्ठित अशा AIIMS मध्ये जागा मिळवली. मात्र, याचं खरं प्रकरण आता समोर आलंय.

आसाममधील NEET विद्यार्थ्यांच्या एका गटानं सर्वप्रथम मीडियासमोर राहुलचे दावे खोटे असल्याचा दावा केला होता. राहुलच्या प्रवेशपत्रात हेराफेरी झाल्याची अनेक संदर्भांद्वारे पडताळणी करण्यात आली. त्यानं हरियाणातील एका विद्यार्थ्याच्या रेकॉर्डचा वापर करून त्याला एम्समध्ये जागा मिळाल्याचे दाखले दिले. राहुलनं मीडियाला दिलेल्या रेकॉर्डमध्ये NEET परीक्षेसाठी त्याचा रोल नंबर 2303001114 होता. राहुलनं दाखवलेल्या कार्डावरही तोच नंबर होता. मात्र, क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये हा नंबर हरियाणाच्या किरणजीत कौरचा असल्याचं उघड झालंय. त्यांची AIR रँक 11656 होती.

Rahul Kumar Das
'धार्मिक कपड्यांना परवानगी द्यायची की, नाही हे कर्नाटकनं ठरवू नये'

आसामच्या प्रसारमाध्यमांनी सर्वप्रथम राहुलची कहाणी उचलून धरली आणि त्यानंतर राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनीही राहुलचा शैक्षणिक खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचं सांगितलं. आसामचे कॅबिनेट मंत्री रणजित कुमार दास (Ranjit Kumar Das) यांनी पाथाचरकुची येथे जाऊन राहुलचा सत्कार केला आणि शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर स्थानिक लोकांनी राहुलच्या आईचं छोटेसं चहाचं दुकान फोडलंय. सध्या राहुल, त्याची आई आणि लहान भाऊ हे तिघंही फरार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या प्रकरणानंतर राहुलनं फेसबुकवर पोस्ट (Facebook Post) टाकत आत्महत्या करण्याची धमकी दिलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com