12th pass Job : 12वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! आजच अर्ज करा | Job Opportunities | Naukri Jobs | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

12th pass Job

12th pass Jobs : 12वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! आजच अर्ज करा

12th pass Jobs:12वी पास विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण त्यांच्यासाठी एक उत्तम नोकरीची संधी आहे कारण काही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मात्र ही संधी महाराष्ट्र स्टाफ सिलेक्शन बोर्डकडून नाही तर मध्य प्रदेश स्टाफ सिलेक्शन बोर्ड (MPPEB) कडून करण्यात आली आहे. (Naukri Jobs Opportunities)

या भरती प्रक्रियेत नर्स, ANM, मिडवाइफ, फार्मासिस्ट आणि गट 5 मधील इतर पदांचा सहभाग आहे. याविषयी 15 मार्च रोजी अधिकृत वेबसाइट peb.mponline.gov.in माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. (Naukri Jobs Opportunities for 12th pass students )

अर्ज करण्याचा कालावधी

नर्स, ANM, मिडवाइफ, फार्मासिस्ट आणि गट 5 मधील इतर पदांसाठी अर्ज करण्याची सुरवात 15 मार्च आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च रोजी आहे.

वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही 21 ते 40 वर्षे असणार.

अर्ज फी

SC/ST/PWBD/OBC (नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपयेआहे

तर इतर श्रेणींसाठी अर्ज फी 500 रुपये आहे

पदांची नावे आणि पद संख्या

 • स्टाफ नर्स – 131 पदे

 • ANM/मिडवाईफ – 2612 पदे

 • ड्रेसर – 155 पदे

 • फार्मासिस्ट ग्रेड 2 – 563 पदे

 • रेडियोग्राफर – 174 पदे

 • सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी – 747 पदे

 • इतर विविध पदे – ९२ पदे

 • प्रयोगशाळा सहाय्यक / तंत्रज्ञ – 378 पदे

पात्रता

 • स्टाफ नर्स - उमेदवारांनी बायोलॉजी/ बीएससी नर्सिंगसह बारावी पास

 • ANM/मिडवाईफ - बायोलॉजी/मिडवाइफरी अभ्यासक्रमासहसह बारावी पास

 • ड्रेसर - ड्रेसरचे पुरेसे ज्ञान आणि बारावी पास

 • फार्मासिस्ट ग्रेड 2 - फार्मसीमध्ये डिप्लोमा

 • रेडियोग्राफर - 12वी पास आणि रेडिओग्राफीमध्ये डिप्लोमा

 • सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी - बारावी पास

 • प्रयोगशाळा सहाय्यक / तंत्रज्ञ - बारावी पास