NCC Entry : एनसीसी विशेष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस सुरवात

राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींना भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून नियुक्त होण्याची संधी मिळणार
NCC Entry in army Online Application Process Begins recruitment pune
NCC Entry in army Online Application Process Begins recruitment puneesakal

पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींना भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून नियुक्त होण्याची संधी मिळणार आहे. सैन्यदलाच्या वतीने एनसीसी विशेष प्रवेश प्रक्रियेचे आयोजन केले असून त्या अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया एनसीसीच्या ५४ व्या अभ्यासक्रमासाठी असून यामध्ये मुला-मुलींना अर्ज करता येणार आहे.

एनसीसीच्या या विशेष प्रवेश प्रक्रियेबाबतची सूचना नुकतीच सैन्यदलाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी पदवीबरोबर उमेदवारांकडे एनसीसीचे ‘सी’ सर्टिफिकेट असणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर उमेदवारांची वयोमर्यादा ही १९ ते २५ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे. यामध्ये एकूण ५५ राखीव जागा ठेवण्यात आल्या असून सेवाकार्य करताना शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना देखील या प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे.

या प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा होणार असून थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती (एसएसबी) होणार आहेत. दरम्यान या प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए) येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा प्रशिक्षणाचा कालावधी ४९ आठवड्यांचा असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यदलात ते अधिकारी म्हणून रुजू होतील.

या आहेत अटी

- उमेदवारांना पदवीमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्‍यक

- दरम्यान पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेल्या उमेदवारांना ही अर्ज करात येणार

- शहीद जवानांच्या पाल्यांसाठी राखीव जागा

- तसेच शहीदांच्या पाल्यांना एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेटची आवश्‍यकता नाही

अशी असेल राखीव जागा

पुरुष उमेदवार ः ४५

महिला उमेदवार ः ४

शहीदांच्या पाल्यांसाठी ः ६

येथे करा अर्ज ः

या प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल. दरम्यान उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत यासाठी अर्ज करता येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com