राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळात नोकरीची संधी !

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळात नोकरीची संधी
Metro
Metroesakal
Summary

भारत सरकार आणि विविध राज्यांच्या सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या एनसीआरटीसीने विविध पदांवर भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे.

सोलापूर : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन कॉर्पोरेशन (ncrtc) मध्ये सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. भारत सरकार आणि विविध राज्यांच्या सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या एनसीआरटीसीने (national capital region transport corporation) विविध पदांवर भरतीसाठी (recruitment 2021) जाहिरात जारी केली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (ncr) मध्ये प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (आरआरटीएस) च्या अंमलबजावणीसाठी एनसीआरटीसीने शनिवारी, 22 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, फेज-1 मध्ये दिल्ली- गाझियाबाद- मेरठ, दिल्ली- गुरुग्राम- एनएनबी- अलवर आणि दिल्ली-पानिपत येथे रॅपिड रेल्वे विकसित केली जाणार आहे. या प्रकल्पांसाठी, एनसीआरटीसी सहाय्यक साइट असोसिएट आणि इतरांच्या 20 पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (ncrtc recruitment 2021 National Capital Region Transport Corporation Hiring 20 vacancies)

Metro
उळेतील युवकांच्या "आक्‍सिजन'ची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

असा करा अर्ज...

एनसीआरटीसी भरती 2021 साठी जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार ncrtc.in वर दिलेल्या अर्जाच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना वेबसाइटला भेट दिल्यानंतर भरती विभागात जावे लागेल, त्यानंतर संबंधित भरती जाहिरातीच्या लिंकवर क्‍लिक करा. भरती जाहिरातीतच अर्ज देण्यात आला आहे. तथापि, उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवरून एनसीआरटीसी भरती 2021 जाहिरात आणि अर्ज डाउनलोड करू शकतात.

Metro
छंद बनला उत्पन्नाचे साधन! शेटफळ येथील महिलेकडे दुर्मिळ वृक्षांचा संग्रह

उमेदवारांनी हा अर्ज भरला पाहिजे, आवश्‍यक कागदपत्रे जोडावीत आणि पुढील पत्त्यावर सबमिट करावीत : करिअर सेल, एचआर विभाग, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (एनसीआरटीसी), 7/6, सिरी फोर्ट संस्था क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली - 110049. तथापि, उमेदवार त्यांचे अर्ज, फॉर्म आणि कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी जारी केलेल्या अधिकृत ई-मेल आयडी - applyonline@ncrtc.in वर मेल करू शकता. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 जून 2021 निश्‍चित करण्यात आली आहे.

रिक्त पदांची संख्या

  • सिनिअर डिझाईन एक्‍स्पर्ट किंवा ऍडिशनल डिझाईन एक्‍स्पर्ट : 1 पद

  • उप मुख्य आर्किटेक्‍ट : 2 पदे

  • असिस्टंट साइट असोसिएट : 9 पदे

  • सिनिअर डिजाईन एक्‍स्पर्ट : 3 पदे

  • असिस्टंट आर्किटेक्‍ट : 3 पदे

  • असोसिएट आर्किटेक्‍ट : 2 पदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com