NDA Admission : धायरीची कन्या एनडीएत देशात ३१ वी, तर मुलींमध्ये तिसरी

भारतीय सशस्त्र दलांना दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्‍ये (एनडीए) पुण्याच्या जुई ढगे हिने मिळविला प्रवेश.
Jui Dhage
Jui Dhagesakal

पुणे - भारतीय सशस्त्र दलांना दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्‍ये (एनडीए) पुण्याच्या जुई ढगे हिने प्रवेश मिळविला आहे. केवळ प्रवेशच नाही तर या एनडीए प्रवेश प्रक्रियेच्या यादीत देशात ३१ वी, तर मुलींमध्‍ये तिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही पुण्यासाठी अभिमानाची बाब ठरत असून, तिच्या या यशामुळे इतर मुलींनाही प्रेरणा मिळत आहे.

धायरी येथे राहणारी १८ वर्षांची जुई सध्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात असून, आई डॉ. मनीषा ढगे या शिक्षण क्षेत्रात, तर वडील राजेंद्र हे एका खासगी कंपनीत क्वालिटी ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. जुईला तिसऱ्या प्रयत्नात एनडीएची लेखीपरीक्षा उत्तीर्ण करता आली. पहिल्याच सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची मुलाखतीची (एसएसबी) प्रक्रिया तिने यशस्वीपणे पूर्ण केली. लेखीपरीक्षा आणि एसएसबी मुलाखत यांच्या एकत्रित गुणांच्या आधारे तिने मुलींमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला.

Jui Dhage
Pune Weather : पुणे शहरात ढगाळ हवामान कायम; उन्हाचा चटका होणार कमी

याबाबत जुई सांगते, ‘सुरवातीपासूनच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्याचा विचार होता. त्यामुळे पदवी शिक्षण झाल्यावर त्यासाठी तयारी करायचे ठरविले होते. मात्र दहावीत जेव्हा एनडीएमध्ये बोर्डाच्या परीक्षेचे केंद्र आले त्या वेळी या प्रशिक्षण संस्थेबाबत समजले. एकूणच येथील वातावरण पाहता आपण ही लष्करात जाऊ, अशी प्रेरणा मिळाली.

त्यानंतर मुलींनाही एनडीएमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय आल्यामुळे मीही बारावीमध्ये एनडीएच्या लेखीपरीक्षेची तयारीला सुरवात केली. दोन वेळा लेखीपरीक्षा दिली; पण त्यात अपेक्षित गुण मिळाले नाही. परंतु तिसऱ्या प्रयत्‍नात मात्र यश मिळाले. एनडीएमध्ये २३ ते २४ जूनदरम्यान दाखल होणार आहे. सैन्यदलाची आवड असल्याने पुढील प्रशिक्षण हे सैन्यदलासाठीचेच घेणार आहे.’’

Jui Dhage
Pune Crime : येरवड्यातील लाच प्रकरणात तीन पोलिस हवालदार निलंबित

‘तिरंदाजी’मध्ये ६५ पदके

जुईने केवळ शिक्षणातच नाही तर खेळातही चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ती तिरंदाज खेळात सक्रिय असून, प्रावीण्य मिळविले आहे. तिला राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत ६५ पदके प्राप्त झाली आहेत. त्यातील १६ ते १७ पदके राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेत मिळविले आहेत. क्रीडा क्षेत्रात ही सक्रिय असल्यामुळे जुईला एसएसबीच्‍या शारीरिक चाचणीमध्ये कोणतीही अडचण जाणवली नाही.

जुईला दहावीत ९३ टक्के, तर बारावीत ८९ टक्के गुण मिळाले होते. पण पुढे कोणत्या क्षेत्रात जायचे, हा तिच्याप्रमाणे आम्हालाही प्रश्‍न होता. परंतु तिने निवडलेले क्षेत्र हे नक्कीच चांगले आहे. देशसेवा करण्याची संधी मला मिळाली नाही; पण माझी मुलगी ती चोखरीत्या पार पाडेल, हा विश्‍वास मला आहे.

- राजेंद्र ढगे, जुईचे वडील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com