emotional intelligence
emotional intelligencesakal

भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाची गरज

सध्या सगळीकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला आहे. एआय आता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनू पाहत आहे.

सध्या सगळीकडे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला आहे. एआय आता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनू पाहत आहे, परंतु इतर सर्व प्राण्यांपासून मानवाला वेगळे आणि श्रेष्ठ ठरवणाऱ्या भावनिक बुद्धिमत्तेकडे मात्र अद्यापही आपण पुरेसे लक्ष देत नाही.

भावनिक बुद्धिमत्तेची उपयुक्तता लक्षात घेऊन त्याकडेही पुरेसे लक्ष दिल्यास व्यक्तिगत किंवा सामाजिक जीवनात आपण साधत असलेला विकास कित्येक पटीने अधिक साधला जाऊ शकतो आणि सर्वांगीणही ठरू शकतो. या भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि उपयुक्तता सांगणारे पुस्तक म्हणजे ख्रिस्तिन विल्डिंग लिखित इमोशनल इंटेलिजन्स. या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर सुचिता नांदापूरकर-फडके यांनी केला आहे.

सन १९९० पासून अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या या पुस्तकात उत्तम जीवनशैलीकरता आवश्यक असणारी भावनिक बुद्धिमत्ता आणि त्यासाठी आपल्यात कोणते बदल होणे अपेक्षित आहे याचा धांडोळा घेतला आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तिचे नेमके महत्त्व काय? स्वमूल्यांकन कसे करता येईल? वैयक्तिक नीतिमूल्यांचा विकास कशा पद्धतीने होऊ शकतो? यांसह विविध मुद्द्यांबद्दल या पुस्तकात विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.

भावनिक बुद्धिमत्ता हा विषय मांडणीसाठी थोडासा क्लिष्ट आणि तात्त्विक विवेचनावर भर देणारा असला तरीदेखील, यातील तत्त्वांची उकल वाचकांना नेमकेपणाने आणि सोप्या पद्धतीने व्हावी यासाठी लेखिकेने प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यासाठी ‘केस स्टडी’ अर्थात उदाहरण दिले आहे.

रागावर नियंत्रण ठेवणे, समाजामध्ये वावरत असताना योग्य पद्धतीने व्यक्त होणे, तीव्र भावनांवर नियंत्रण ठेवून संतुलित कृती करणे यांसारख्या अनेक जीवनकौशल्यांबाबत या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे.

या पुस्तकात सामाजिक संभाषणकौशल्य या विषयाकरिता एक स्वतंत्र प्रकरण देण्यात आले असून, केस स्टडीच्या माध्यमातून हे कौशल्य कशा पद्धतीने अधिक चांगले विकसित होईल, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळेच यशस्वी होण्यासाठीची जीवनकौशल्ये विकसित करण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरणारे आहे.

(संकलन : रोहित वाळिंबे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com