esakal | NEET 2021 Exam Date: सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा; वाचा कसा कराल अर्ज?
sakal

बोलून बातमी शोधा

NEET EXAM

NEET 2021 Exam Date: सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा; वाचा कसा कराल अर्ज?

sakal_logo
By
विनायक होगाडे

NEET 2021: नीट परीक्षेच्या तारखांची घोषणा सरतेशवेटी झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली आहे. शिक्षण मंत्र्यांनी ट्विट करुन सांगितंलय की, NEET (UG) 2021 ची परीक्षा 12 सप्टेंबर रोजी होईल. याआधी ही परीक्षा एक ऑगस्ट रोजी होणार होती. त्यांनी सांगितलंय की, या परीक्षेदरम्यान कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील. NTA च्या वेबसाईटवर मंगळवारी यासंदर्भात अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होईल.

हेही वाचा: मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या महिलेची तक्रार, दिल्ली HC ची माध्यम समुहांना नोटीस

पुढे त्यांनी म्हटलंय की, कोरोना नियमावली पाहता सर्व विद्यार्थ्यांना सेंटरवच फेस मास्क उपलब्ध करुन दिले जातील. याशिवाय एंट्री आणि एक्झीटसाठी टाईम स्लॉट निश्चित असेल. कॉन्टॅक्टलेस रजिस्ट्रेशन, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगसोबत कोरोनाची नियमावली पाळूनच परीक्षा घेतल्या जातील. पुढे त्यांनी म्हटलंय की, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी ज्या शहरांमध्ये परीक्षा होणार आहे, त्यांची संख्या 155 वरुन वाढवून 198 केली गेली आहे. परीक्षा केंद्र देखील 2020 च्या तुलनेत वाढवून 3862 करण्यात आले आहेत.

हेही वाचा: 'मी दोषी असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील'

कोरोनामुळे गडबडली व्यवस्था

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशातील शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची परिस्थिती आहे. या महासंकटामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सोबतच उच्चशिक्षणासाठीच्या असलेल्या प्रवेश परीक्षा देखील स्थगित कराव्या लागल्या आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थी NTA NEET 2021 च्या रजिस्ट्रेशन तारखेची वाट पाहत आहेत.

अर्ज कधी करु शकाल?

NEET UG 2021 Application: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलंय की, अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारी 13 जुलैपासून सुरु होईल. नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) च्या वेबसाईटवर nta.ac.in अथवा ntaneet.nic.in वर अर्जासाठी लिंक जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यी कोणत्याही वेबसाईटवर जाऊन हा अर्ज भरू शकतात.

loading image