

NEET Exam
ESakal
मुंबई : राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (२ मे) घाेषित करण्यात येणार आहे. दुसऱ्याच दिवशी रविवारी विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ देणार आहेत. त्यामुळे बारावीच्या निकालाचा परिणाम नीटमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मंडळाच्या घाईमुळे ‘नीट’च्या लाखो मुलांचे टेन्शन वाढवले आहे. यामुळे पालक-विद्यार्थ्यांत प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.