

NEET PG Re-Exam
ESakal
जयपूरमधील सीतापुरा केंद्रांवर होणाऱ्या नीट पीजी परीक्षेत वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे या केंद्रावरील परीक्षेदरम्यान मोठा व्यत्यय आला असून परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे आता ही परीक्षा पुन्हा कधी घेणार असा प्रश्न विचारला जात असताना याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.