Artificial Intelligence : नवीन शैक्षणिक धोरणातही ‘एआय’चा समावेश! चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच
new education policy artificial intelligence winter session education engineering syllabus
new education policy artificial intelligence winter session education engineering syllabusSakal

Nagpur News : जगभरातील विविध क्षेत्रांत ज्ञान आणि माहितीसाठी चर्चा आणि आव्हानाचा विषय ठरलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) विधान परिषदेत पहिल्यांदाच वाचा फुटली. हा विषय नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिला जात आहे,

त्यासाठी मागणीही असून या विषयात पदवी घेणारे १४ हजार २७७ विद्यार्थी आहेत; तर पदवी देणारी २२० महाविद्यालये आणि पदविका देणाऱ्या ४१ संस्थांमध्ये एक हजार ९४७ विद्यार्थी ‘एआय’चा अभ्यास करत आहेत. त्यांना पदवी मिळणार असल्याचे सांगत नवीन शैक्षणिक धोरणातही ‘एआय’सारखा विषय देता येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय यांनी एआय विषयावर लक्षवेधी सूचनेद्वारे मांडून सभागृहाचे लक्ष वेधले होते. यासाठी विविध क्षेत्रांत निर्माण होणारी आव्हाने आणि त्यावरील काही पर्याय आताच विचारात‍ घेऊन त्यावर उपाय करण्याच्या सूचना त्यांनी मांडल्या.

भारतीय यांनी राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या २३ लाख विद्यार्थ्यांना एआयच्या विषयावर सर्वंकष विचार करून ‘रोडमॅप’ तयार करावा लागेल अशी मागणी केली. तसेच एआयचा उपयोग रोजगारवाढीसाठी होतोय का, याचा विचार होण्याची गरज आहे.

यासाठी विविध अभ्यासक्रम, शाखांची आवश्यकता असल्याने उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांना यावर प्रभावी उत्तर देता आले नाही. त्यांनी केवळ सर्व सूचना मान्य असल्याचे सांगितले. अशा कुठल्याही विषयात सरकार मागे राहणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

...तर आश्चर्य वाटणार नाही!

‘एआय’चा दुरुपयोग टाळायचा असेल तर यात शालेय शिक्षण विभागालाही सामावून घ्यावे लागेल. संयुक्तरीत्या कार्यक्रम राबवणार का, असा सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी केला. त्यावर पाटील यांनी एकत्र बसून सूचना दिल्या जातील असे आश्वासन दिले.

सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात‍ घेऊन उद्या (ता. १९) आपलेच प्रतिविधानमंडळ ‘एआय’वर चालवून दाखवल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही असे म्हटले.

यासंदर्भात जे अपडेट आहेत, त्याची माहिती सदस्यांना देण्याच्या सूचनाही सभापतींनी दिल्या. यावर आयआयटीसारख्या संस्थांशी काही करार करता येतील काय, यावर विचार करण्याचे आश्वासन पाटील यांनी या वेळी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com