esakal | NIRF रँकिंग जाहीर; IIT मद्रास नंबर वन, पाहा टॉप टेन यादी
sakal

बोलून बातमी शोधा

NIRF रँकिंग जाहीर; IIT मद्रास नंबर वन, पाहा टॉप टेन यादी

NIRF रँकिंग जाहीर; IIT मद्रास नंबर वन, पाहा टॉप टेन यादी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी २०२१ या वर्षासाठीचे एनआयआरएफ रँकिंग जारी केले आहे. यामध्ये वर्षभरात सर्व प्रकारात आयआयटी मद्रास देशातील बेस्ट शैक्षणिक संस्था म्हणून निवडण्यात आली आहे. तर IISC बेंगळुरु दुसऱ्या आणि IIT Bombay तिसऱ्या स्थानी आहे. बेस्ट युनिव्हर्सिटीच्या प्रकारात गेल्या वर्षी प्रमाणे IISC बेंगळुरु पहिल्या स्थानावर असून जेएनयू दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर बीएचयु आहे.

रँकिंग फ्रेमवर्कमध्ये टॉप रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅटेगरीचा समावेश करण्यात आला आहे. या कॅटेगरीत IISC बेंगळुरु पहिल्या क्रमांकावर आहे. IIT मद्रात दुसऱ्या तर IIT बॉम्बे तिसऱ्या स्थानावर आहे.

OverAll Catagory मध्ये देशातील टॉप टेन १० संस्था

IIT मद्रास

IISC बेंगळुरु

IIT दिल्ली

IIT बॉम्बे

IIT खडगपूर

IIT कानपूर

IIT गुवाहाटी

जेएनयू

IIT रुर्की

बीएचयू

कोरोनामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा रँकिंग जारी करण्याचा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला. यामध्ये रिसर्च, ओव्हरऑल, युनिव्हर्सिटी, मॅनेजमेंट, कॉलेज, फार्मसी, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, एआरआयआयए आणि लॉ यांचा समावेश आहे.

हेही वाचा: राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क जारी करण्यात येते. देशातील विद्यापीठ, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि फार्मसी संस्थांच्या रँकिंगसाठी एनआयआरएफ संस्था काम करते. याआधी रँकिंगसाठी कोणतीही सरकारी संस्था नव्हती. विविध निकषांच्या आधारे सरकारकडून संस्थांचे रँकिंग दिले जाते.

loading image
go to top