esakal | इंडियन नेव्हीमध्ये मॅट्रिकच्या भरतीसाठी अधिसूचना जारी ! 23 जुलैपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Navy

इंडियन नेव्हीमध्ये मॅट्रिकच्या भरतीसाठी अधिसूचना जारी !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

ऑक्‍टोबर 2021 मध्ये सुरू होणारी मॅट्रिक रिक्रूट भरतीची अधिसूचना भारतीय नौदलाने जाहीर केली आहे.

सोलापूर : इंडियन नेव्हीमध्ये (Indian Navy) मॅट्रिक रिक्रूट (MR) (Matric recruitment) ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ऑक्‍टोबर 2021 मध्ये सुरू होणारी मॅट्रिक रिक्रूट भरतीची अधिसूचना भारतीय नौदलाने जाहीर केली आहे. इंडियन नेव्ही एमआर रिक्रूटमेंटच्या अधिसूचनेनुसार नाविक एमआरच्या जवळपास 350 रिक्त पदांसाठी (अंदाजे) निवड प्रक्रियेतून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या रिक्त जागा राज्यांनुसार संख्या निर्धारित करण्यात आलीआहे. एकूण 350 रिक्त जागांसाठी अर्जाच्या तपशिलांच्या आधारे 1750 उमेदवारांना लेखी चाचणी व शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीएफटी) साठी आमंत्रित केले जाणार आहे. राज्यांनुसार कट ऑफ वेगवेगळे असू शकतात. (Notification has been issued for recruitment of Matric in Indian Navy)

हेही वाचा: 'इग्नू'ने केला बीएड प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर! 'या' लिंकवरून पाहा निकाल

जाणून घ्या पात्रता

नाविक मॅट्रिक रिक्रूट पदांच्या भरतीसाठी जारी केलेल्या भारतीय नौदलाच्या एमआर अधिसूचना 2021 नुसार, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या कोणत्याही शालेय शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 2001 पूर्वी आणि 30 सप्टेंबर 2004 नंतरचा नसावा.

निवड प्रक्रिया

भारतीय नौदलातील नाविक मॅट्रिक रिक्रूट पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व शारीरिक कार्यक्षमता या कसोटीच्या आधारे केली जाणार आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव देशभर सर्वत्र पाहता 350 पदांसाठी एकूण 1750 उमेदवारांना परीक्षेसाठी आणि पीएफटीसाठी आमंत्रित केले जाईल. या उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग पात्रता परीक्षा (दहावी) गुणांच्या आधारे करण्यात येईल.

हेही वाचा: पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाइन ! कोरोनामुळे विद्यापीठाचा निर्णय

असा करा अर्ज

भारतीय नौदलामध्ये नाविक मॅट्रिक भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार एए -150 आणि एसएसआर-02/2021 च्या ऑनलाइन अर्ज फॉर्मद्वारे नेव्ही रिक्रूटमेंट पोर्टल joinindiannavy.gov.in वर अर्ज करू शकतात. ऍप्लिकेशन विंडो 19 ते 23 जुलै 2021 पर्यंत खुली असेल.

भरती सूचना http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10701_7_2122b.pdf येथे पाहा

loading image