आज जारी होईल UPSC 2022 साठी पहिल्या NDA परीक्षेची अधिसूचना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC
आज जारी होईल UPSC 2022 साठी पहिल्या NDA परीक्षेची अधिसूचना!

आज जारी होईल UPSC 2022 साठी पहिल्या NDA परीक्षेची अधिसूचना!

सोलापूर : UPSC NDA परीक्षेची (UPSC NDA Exam) तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची सूचना. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (Union Public Service Commission - UPSC) 2022 च्या पहिल्या संयुक्त संरक्षण अकादमी (NDA) परीक्षेसाठी बुधवार, 22 डिसेंबर 2021 रोजी अधिसूचना जारी करेल. आयोगाकडून अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की एनडीए 1 अधिसूचना 2022 च्या प्रकाशनासह अर्ज प्रक्रिया सुरू होईल. त्याचवेळी, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अलीकडील संबंधित आदेशाचे पालन करून महिला उमेदवारांना आयोगाद्वारे UPSC NDA (1) परीक्षा 2022 मध्ये अर्ज करण्याची संधी देखील दिली जाईल. तसेच UPSC द्वारे दरवर्षी दोनदा आयोजित केल्या जाणाऱ्या NDA परीक्षेच्या पहिल्या आवृत्तीच्या अधिसूचनेमध्ये घोषित केलेल्या एकूण रिक्त जागांपैकी महिला उमेदवारांसाठी राखीव जागा देखील जाहीर केल्या जातील. (Notification of first NDA exam for UPSC 2022 will be issued on Wednesday)

अर्ज प्रक्रिया आणि शुल्क

UPSC NDA परीक्षा 2022 साठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहणारे असे सर्व उमेदवार अधिसूचना जारी झाल्यानंतर UPSC च्या ऍप्लिकेशन पोर्टल, upsconline.nic.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. आयोगाने जाहीर केलेल्या 2022 च्या परीक्षा दिनदर्शिकेनुसार, NDA (I) परीक्षा 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2022 निश्‍चित करण्यात आली आहे. अर्जादरम्यान, उमेदवाराला 100 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. तथापि, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांकडून शुल्क आकारले जाणार नाही.

जाणून घ्या पात्रता

UPSC द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या NDA (1) परीक्षा 2022 अंतर्गत, आर्मी विंगच्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तर, हवाई दल आणि नौदल शाखेसाठी उमेदवारांनी भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Mathematics) विषयासह 10+2 परीक्षा उत्तीर्ण केल्या पाहिजेत. 2021-22 या शैक्षणिक वर्षात 12वी बोर्डाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार देखील NDA 1 परीक्षा 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

UPSC NDA (1) परीक्षा 2022 तारीख

UPSC कॅलेंडरनुसार UPSC NDA (1) परीक्षा 2022 ही 10 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्याचवेळी परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ई-प्रवेशपत्रे परीक्षेच्या तारखेच्या तीन आठवडे आधी आयोगाकडून जारी केली जातील.

टॅग्स :UPSCeducationjobsupdate