4-year UG programme : आता तीनएवजी ४ वर्षांतही पदवी मिळविता येणार!

‘यूजीसी‘चे नवे नियम तयार
Now you can get degree in 4 years instead ugc education news student
Now you can get degree in 4 years instead ugc education news studentsakal

नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) उच्चशिक्षण संस्थांमध्ये चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठीचे नियम (एफवाययूपी) तयार केले आहेत. यासाठीच्या 'करिक्युलम अँड क्रेडिट फ्रेमवर्क फॉर फोर इअर अंडरग्रेजुएट प्रोग्राम्स'चा मसुदा सोमवारी (ता.१२) प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. ही योजना आगामी म्हणजे २०२३-२४ च्या शैक्षणिक सत्रापासून राबविण्याचा सरकारचा मानस असला तरी सध्या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही चार वर्षांत पदवी (‘यूजी ऑनर्स') मिळवण्याची संधी मिळू शकते. नरेंद्र मोदी सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवीबाबतचा नवीन मसुदा तयार करण्यात आलेला आहे.

सध्या तीन वर्षांचा यूजी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनर्स पदवी मिळते. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार एफवाययूपी नियमावली स्वीकारणारी विद्यापीठे आगामी शैक्षणिक सत्रापासून प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना नवीन योजनेच्या कक्षेत आणण्याची संधी मिळू शकते. त्याबाबत संबंधित विद्यापीठाची शैक्षणिक व कार्यकारी परिषद अंतिम निर्णय घेईल. चार वर्षांच्या या प्रस्तावित पदवी अभ्यासक्रमात प्रथमच प्रवेश घेणाऱ्यांनाच संधी मिळेल व त्याचे निकाल चार वर्षांनी मिळतील. नवीन नियमावलीची सविस्तर माहिती ती प्रसिध्द झाल्यानंतरच समजू शकेल.

‘यूजी ऑनर्स' पदवीबाबत यूजीसीच्या योजनेनुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तीनऐवजी चार वर्षे पूर्ण केल्यानंतर 'ऑनर्स' पदवी मिळू शकेल. नवीन नियमांनुसार जे विद्यार्थी ३ वर्षांत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छितात, त्यांना त्या सेमिस्टरमधील शैक्षणिक तासांच्या संख्येनुसार मोजलेले १२० गुणांक (क्रेडिट्स) मिळविणे आवश्यक राहणार आहे. यूजी ऑनर्स पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना १६० क्रेडिट्स मिळविणे आवश्यक राहणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला संशोधन क्षेत्रात विशिष्ट विषयांत अभ्यासक्रम पूर्ण ( स्पेशलायझेशन) करायचा असेल तर त्यांना त्यांच्या चार वर्षांच्या अभ्यासक्रमातच संशोधन प्रकल्प हाती घ्यावा लागेल नंतर त्यांना त्या विशेष विषयासह सन्मान पदवी मिळेल.

एफवाययूपीच्या प्रस्तावित अभ्यासक्रमात मुख्य प्रवाहातील, कमी कालावधीचे, इतर विषयांचे, भाषाविषयक, कौशल्य यासह पर्यावरण शिक्षण, योगशिक्षण, क्रीडा आणि फिटनेस यावरील अभ्यासक्रमांचा समावेश असेल असे समजते. दुसऱ्या सत्राच्या शेवटी विद्यार्थी त्यांच्या निवडलेल्या विषयासह अभ्यास सुरू ठेवण्याचा किंवा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमाबाबतचा नवीन आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती मिळते. चार वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रत्येक शैक्षणिक सत्रात (सेमिस्टर) विद्यार्थ्यांना विशिष्ट शाखेत प्रवेश आणि बाहेर पडण्याचे अनेक पर्याय मिळणार आहेत. यानुसार पदवी अभ्यासक्रमाचे एक वर्ष पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल. दोन वर्षांच्या अभ्यासानंतर पदविका, ३ वर्षे आणि ६ सेमिस्टर पूर्ण करणारांना बॅचलरची पदवी, तर चार वर्षांचा अभ्यास पूर्ण करणाऱ्यांना ऑनर्स आणि संशोधनाच्या (रिसर्च) पदवीसह बॅचलर म्हणजे ‘पदवीधऱ' प्रमाणपत्र मिळेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com