
UGC NET Exam Update Marathi News : युजीसी नेट परीक्षा १५ जानेवारी २०२५ रोजी पार पडणार होती, ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. तसंच परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, पण १६ तारखेला होणारी परीक्षा आहे त्याच शेड्युलप्रमाणं होईल, असं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. मकर संक्रांती आणि पोंगल हे दोन्ही सण एकामागून एक आल्यानं परीक्षा रद्द करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं आहे.