esakal | युजीसी नेट परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
sakal

बोलून बातमी शोधा

UGC NET exam

युजीसी नेट परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) मार्फत देशभरात घेण्यात येणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC-NET) 2021 परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. यासाठीचे सुधारीत वेळापत्रक (Exam New Timetable) आज जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा: अँटिलिया स्फोटक प्रकरण: NIA कडून १० हजार पानी आरोपपत्र दाखल

देशभरात युजीसी नेटची परीक्षा ही 6 ते 11 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र याच कालावधीत 10 ऑक्टबरदरम्यान देशात विविध प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील अन्य प्रमुख परीक्षाही होणार आहेत. या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना नेट परीक्षेसाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी एनटीएने नेट परीक्षेच्या तारखेत बदल केला आहे. यामुळे आता नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा आता 6 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात होणार आहे. परीक्षेच्या नवीन तारखा आणि वेळापत्रक युजीसी आणि एनटीएची वेबसाईट ugcnet.nta.nic.in आणि nta.ac.in वर जाहीर करण्यात आले आहे.

loading image
go to top