अकरावी प्रवेशासाठी १७ मे पासून ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Admission
अकरावी प्रवेशासाठी १७ मे पासून ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू

अकरावी प्रवेशासाठी १७ मे पासून ऑनलाइन अर्ज नोंदणी

पुणे - दहावीची बोर्डाची परीक्षा (SSC Board Exam) संपल्यानंतर आता तुम्ही विद्यार्थ्यांच्या (Students) अकरावीच्या प्रवेशाच्या (Eleventh Admission) प्रतीक्षेत असाल, तर इकडे लक्ष द्या. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर (Website) नोंदणी (Registration) व अर्जाचा (Form) एक भाग भरण्याची प्रक्रिया १७ मे पासून सुरू होणार आहे. परंतु त्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया समजून घेता यावी, ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्याचा सराव व्हावा, यासाठी १ ते १४ मे दरम्यान ‘मॉक डेमो रजिस्ट्रेशन’ करता येणार आहे.

यंदा दहावीची बोर्डाची परीक्षा ४ एप्रिल रोजी संपली. त्यानंतर दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०२२-२३ मधील प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू करण्याची सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष ऑनलाइन प्रवेश नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ मे पासून सुरू होणार असून दहावीचा निकाल लागेपर्यत ही प्रक्रिया सुरू राहील. तसेच ऑनलाइन प्रवेश क्षेत्र वगळता उर्वरित राज्यात प्रवेश हे प्रचलित पद्धतीनुसार कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून करण्यात येत आहे.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड यांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२१-२२ मधील प्रवेश प्रक्रिया ३१ डिसेंबरला पूर्ण झाली. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी तीन नियमित फेऱ्या, विशेष फेरी, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) अशा प्रवेश फेऱ्या राबविण्यात येणार आहेत.

विभागीय उपसंचालकांना दिलेल्या सूचना -

- अकरावी प्रवेश प्रक्रियेची पूर्व तयारी करणे

- विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन मिळावे, उद्‌बोधन वर्ग आयोजित करणे

- क्षेत्र स्तरावर समन्वय यंत्रणा सक्षम करून त्यानुसार कार्यवाही करावी

- ऑनलाइन क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनाही या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करावे

- मागासवर्गीय, विशेष प्रवर्गात समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आरक्षणासाठी कागदपत्रे अगोदरच काढून ठेवण्याबाबत जागृती करणे

- शाळा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे

आवश्यक कागदपत्रे शाळेत असतानाच मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्यात

‘‘विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी महसूल यंत्रणेस विशेष मोहिम राबविण्याची विनंती विभागीय उपसंचालकांनी करावी. तसेच माध्यमिक शाळांनी आपल्या विद्यालयातील नववी, दहावीतील विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतानाच अशी कागदपत्रे विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.’’

- महेश पालकर, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक

अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक (शैक्षणिक वर्ष २०२२-२३) :

तपशील : कालावधी

- ‘मॉक डेमो रजिस्ट्रेशन’ अंतर्गत संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग एक भरणे सराव : १ ते १४ मे

- प्रत्यक्ष संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग एक भरणे/ अर्ज प्रमाणित (व्हेरीफाय) करून घेणे, माध्यमिक शाळा/ मार्गदर्शन केंद्रांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील माहिती, भाग एक ऑनलाइन तपासून प्रमाणित करणे : १७ मे ते दहावीच्या निकालापर्यत

- उच्च माध्यमिक शाळा नोंदणी आणि कनिष्ठ महाविद्यायांनी भरलेली माहिती तपासून शिक्षण उपसंचालकांनी ऑनलाइन प्रमाणित करणे : २३ मे ते दहावीच्या निकालापर्यंत

- विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर अर्जाचा भाग दोन भरणे, पसंतीक्रम नोंदविणे, कोटांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश सुरू : दहावीच्या निकालानंतर पाच दिवसांनी होणार सुरू

Web Title: Online Application Registration 11th Admission Will Start From 17th May Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top