esakal | परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया झाली सुरू!
sakal

बोलून बातमी शोधा

Medical Graduate Exams

परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया झाली सुरू!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (नॅशनल बोर्ड ऑफ एक्‍झामिनेशन : एनबीई) परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा, एफएमजीई (Foreign Medical Graduate Examination, FMGE) परीक्षेची नोंदणी प्रक्रिया शुक्रवारपासून म्हणजेच 16 एप्रिल 2021 पासून सुरू झाली आहे. या परीक्षेच्या अर्जासाठी नोंदणी लिंक सक्रिय झाली आहे.

ज्यांना एफएमजीई- 2021 जून सत्रासाठी अर्ज करायचा असेल तर ते एनबीईच्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर ऑनलाइन नोंदणी करू शकतात. एफएमजीई 2021 अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 मे आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.

परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेसाठी करा अशी नोंदणी

फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा (एफएमजीई) साठी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम एनबीईच्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. यानंतर, मेन पेजवरील On FMGE टॅबवर क्‍लिक करा. यानंतर नवीन रजिस्ट्रेशन टॅब शोधा आणि त्यावर क्‍लिक करा. यानंतर फोन नंबर, ई-मेल आयडी, पत्ता आदी तपशील दाखल करा. यानंतर यशस्वी नोंदणीनंतर उमेदवाराच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर लॉग इन सर्टिफिकेट पाठविले जाईल. त्यानंतर पोर्टलवर परत जा आणि अर्ज भरण्यासाठी लॉग इन सर्टिफिकेट दाखल करा. त्यानंतर आपला वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आदी प्रविष्ट करा. यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बॅंकिंगद्वारे अर्जाची फी भरा. यानंतर योग्य पद्धतीने भरलेल्या अर्जाच्या प्रतीची एक प्रत डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याचे प्रिंटआउट घ्या.

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीई) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा संगणक- आधारित चाचणी (सीबीटी) म्हणून एफएमजीई परीक्षा घेईल. त्याचबरोबर ही परीक्षा 18 जून रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की या परीक्षेसाठी 7080 रुपये फी भरावी लागेल.