fashion
fashionsakal

फॅशन डिझाईनमधील संधी

फॅशन सातत्याने बदलत असते आणि तरीही ती त्या त्या कालखंडात लोकप्रिय असते. क्रिएटिव्ह आणि अत्यंत गतिमान विचार करणाऱ्या नव्या पिढीला फॅशनमध्ये चांगला वाव आहे. फॅशन क्षेत्रात पूर्वी छोटेखानी अभ्यासक्रम प्रचलित होते. परंतु आता फॅशनमधील शिक्षणाचादेखील ट्रेंड बदलला आहे.

करिअर अपडेट

प्रा. विजय नवले,करिअरतज्ज्ञ

फॅशन सातत्याने बदलत असते आणि तरीही ती त्या त्या कालखंडात लोकप्रिय असते. क्रिएटिव्ह आणि अत्यंत गतिमान विचार करणाऱ्या नव्या पिढीला फॅशनमध्ये चांगला वाव आहे. फॅशन क्षेत्रात पूर्वी छोटेखानी अभ्यासक्रम प्रचलित होते. परंतु आता फॅशनमधील शिक्षणाचादेखील ट्रेंड बदलला आहे. कोणत्याही वस्तूच्या सौंदर्याविषयीच्या बौद्धिक, कलात्मक आणि कल्पनात्मक निर्माणाविषयी अंदाज लावू पाहणाऱ्यांना चांगले शिक्षण घेऊन आपल्यातील कलागुणांना वाव देण्याची संधी या क्षेत्रात आहे. फॅशन या क्षेत्रात अनेक पदवी अभ्यासक्रम बारावीनंतर उपलब्ध आहेत.

बॅचलर ऑफ डिझाईन (फॅशन)

कालावधी : चार वर्षे

पात्रता : कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक. वय कमीत कमी १७ वर्षे असावे.

प्रवेशपरीक्षा

एनआयएफटी, युसीड, एआयईईडी, सीड या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसोबतच संबंधित विद्यापीठांच्या आणि संस्थांच्या प्रवेशप्रक्रिया असतात. क्वचित काही ठिकाणी बारावीच्या गुणांवर थेट प्रवेश मिळू शकतो.

विषय

बेसिक डिझाईन, फायबर, फॅब्रिक , फॅशन मटेरिअल्स, टेक्स्टाइल, गारमेंट्सची निर्मिती, भारतीय पारंपरिक पोशाख, डिझाईनमधील संगणकाचा वापर, वस्त्र निर्मिती आणि त्याचे प्रकार, ड्रेपिंग, ड्राफ्टिंग, फॅशन फोटोग्राफी, फॅशन पोर्टफोलिओ, वस्त्र विपणन, टेक्श्चर , स्केचिंग, मॅचिंग्ज इत्यादी विषयांच्या माध्यमातून फॅशनमधील अनेक आयाम शिकविले जातात. शिक्षणामध्ये फॅशन डिझाईन, निर्मिती, गुणवत्ता व्यवस्थापन, मार्केटिंग अशा सर्व ज्ञानशाखांचा अभ्यास असतो. संस्कृती आणि फॅशन, फॅशनचा इतिहास, फॅशन स्टुडिओ, फॅशनमधील विविध व्यवसाय यांची ओळख करून दिली जाते. प्रात्यक्षिकेही घेतली जातात.

नोकरी कुठे?

धागेनिर्मिती, कापडनिर्मिती, वस्त्रोद्योगासाठीचे कारखाने, फॅशन डिझाईनची केंद्रे, बुटिक्स, टेक्स्टाईल ब्रॅण्ड्स इत्यादी ठिकाणी नोकरी मिळू शकते.

संधींचे प्रकार

टेक्स्टाईल डिझाइनर, फॅशन डिझाइनर, स्टायलिस्ट, फॅशन इन्फ्लुएन्सर, मार्केटिंग स्पेशालिस्ट, ब्रँड मॅनेजर, ग्राफिक डिझायनर्स फॉर फॅशन, डिझाईन मॅनेजर अशा संधी मिळू शकतात.

इतर स्पेशलायझेशन्स

फॅशन डिझाईनप्रमाणेच लेदर, ॲक्सेसरी, टेक्स्टाइल, नीटवेअर डिझाईन, फॅशन कम्युनिकेशन्स हे अन्य विषय घेऊन स्पेशलायझेशन करता येते.

कौशल्ये

क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक स्किल्स, रंगांचा उत्तम अभ्यास, दर्जेदार स्केचिंग, सौंदर्यदृष्टी, कापड-धागे-फॅब्रिकच्या निर्मितीचा अभ्यास, कल्पनाशक्ती, संवादकौशल्ये, नियोजन, सुंदर सादरीकरण ही कौशल्ये आणि फॅशनविषयी आवड असल्यास उत्तम करिअर होऊ शकते.

आश्वासक करिअर

फॅशन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात या क्षेत्रातील कामाच्या संधी कधीच कमी होणार नाहीत. हे काम प्रीमियम मार्केटच्या प्रकारात असल्याने व्यवसायातून मोठे उत्पन्न, स्वयंरोजगारात प्रचंड नफा आणि नोकरीतही चांगला पगार मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लोबल मार्केटमधील संधींचा लाभही या क्षेत्रात मिळू शकतो. करमणूक क्षेत्र, फिल्म, नाटक अशा चंदेरी दुनियेत उत्तम करिअर होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com