Defense Services : युवकांना संरक्षण सेवेत अधिकारी होण्याची संधी

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून राज्यातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने जाता यावे, त्यासाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना राज्य शासनाने केली आहे.
Defence Service
Defence Servicesakal
Summary

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून राज्यातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने जाता यावे, त्यासाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना राज्य शासनाने केली आहे.

मुंबई - संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून राज्यातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने जाता यावे, त्यासाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना राज्य शासनाने केली आहे. या संस्थेद्वारे सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षणासाठी ४७ व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा, त्याचा जन्मदिनांक १ जानेवारी २००७ ते ३१ डिसेंबर २००८ दरम्यान असावा, मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला बसणार असावा आणि जून २३ मध्ये अकरावीमध्ये प्रवेश घेण्यास पात्र असावा. सैन्य दलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी उमेदवार पात्र असावा. तसेच यूपीएससीने एनडीए आणि आयएनएसाठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषांसाठी उमेदवार पात्र असणे आवश्यक आहे. यासाठी ९ एप्रिल रोजी राज्याच्या विविध केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात येणार असून यामध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज

संरक्षण सेवेत जाण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी १२ मार्च २०२३ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत. ऑनलाईन अर्ज संस्थेच्या www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हॉल तिकीट ३० मार्च २३ रोजी सकाळी दहा वाजल्यानंतर संस्थेच्या याच संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे. राज्यातील युवकांनी मोठ्या संख्येने संरक्षण सेवेत अधिकारी होण्याची संधी घ्यावी, असे आवाहन या संस्थेचे प्रभारी संचालक मेजर (निवृत्त) एस. फिरासत यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com