

AI Video Editing Tools
Sakal
सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर
डिजिटल युगात माहिती प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे झाले आहे. यु-ट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि लिंक्डिन यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर छोट्या व्हिडिओंना चांगलीच पसंती मिळत आहे. मात्र एखादा ३० ते ६० मिनिटांचा व्हिडिओ संपादित करून त्यातील महत्त्वाचे भाग वेगळे काढणे, त्यात कॅप्शन टाकणे आणि सोशल मीडियासाठी योग्य स्वरूपात तयार करणे हे वेळखाऊ काम असते.