व्यक्तिमत्त्व खुलवणारी सॉफ्ट स्किल्स

आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी असावे असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी आपण विशेष प्रयत्नदेखील करत असतो.
personality development soft skills which shows most valued person
personality development soft skills which shows most valued personSakal

आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी असावे असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी आपण विशेष प्रयत्नदेखील करत असतो. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे ‘सॉफ्ट स्किल्स’ आत्मसात करणे. यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाला उपयुक्त ठरणारी ही कौशल्येसूत्रे ‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स’ या अंजली अभय धानोरकर लिखित पुस्तकाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहेत.

सॉफ्ट स्किल्स केवळ इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी आत्मसात करायची असतात, असा अनेकांचा समज असतो. मात्र, स्वतःच्या दोषांवर मात केल्याचे आत्मिक समाधान अनुभवण्यासाठी, स्वतःच्या कक्षा विस्तारण्याचा आनंद आणि परिपक्वतेची अनुभूती घेण्यासाठीदेखील सॉफ्ट स्किल्स आवश्यक असल्याची जाणीव लेखिकेने पुस्तकाच्या माध्यमातून करून दिली आहे.

त्याचप्रमाणे यात मांडण्यात आलेल्या संकल्पना व्यवहारिक स्तरावर कशा अंमलात आणता येतील याबद्दलही या पुस्तकात उदाहरणासह मार्गदर्शन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने संवाद कौशल्य, भाव-भावनांवरील नियंत्रण, आंतरिक प्रेरणा, दृष्टिकोनाची व्यापकता, निर्णय क्षमता,

अचूक आणि प्रभावी मांडणी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नातेसंबंध टिकवणे यांसारख्या सर्वसमावेशक आणि सर्वांसाठीच आवश्यक असलेल्या ‘सॉफ्ट स्किल्स’बद्दल चर्चा करण्यात आली आहे. सॉफ्ट स्किल्स आत्मसात करत असताना स्वतः समृद्ध होण्याबरोबरच समाज ऋणाची जाणीव ठेवत सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी काय करता येईल, याबद्दलही लेखिकेने आवर्जून मार्गदर्शन केले आहे.

कोणत्याही अगम्य आणि केवळ कागदी वाटतील अशा संकल्पना या पुस्तकात मांडण्यात आलेल्या नसून ज्याला खरोखरच व्यक्तिमत्त्व विकास करायचा आहे त्याच्यासाठी अगदी सोप्या भाषेत आणि काळाशी सुसंगत व व्यवहार्य मार्गदर्शन पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तक्ते आणि आकृत्या यांच्या माध्यमातूनही विविध विषय सोपे करून सांगण्यात आले आहेत.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात यांत्रिक ज्ञानाबरोबरच सॉफ्ट स्किल्स असणाऱ्या व्यक्तीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या काळाशी सुसंगत सॉफ्ट स्किल्स नेमकी कशी आत्मसात करावीत आणि त्यातून यशाचे टप्पे चढत असताना मानसिक समाधानाची सखोल अनुभूती घेण्याची क्षमता कशी विकसित करावी हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक आपल्याला उपयुक्त ठरणार आहे.

(संकलन : रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com