esakal | PFRDA भरती 2021 : सहाय्यक व्यवस्थापक पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

PFRDA भरती 2021 : सहाय्यक व्यवस्थापक पदांची भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने अधिसूचना जारी करून अधिकारी ग्रेड-ए (सहाय्यक व्यवस्थापक) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.

PFRDA भरती 2021 : सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (पीएफआरडीए) (Pension Fund Regulatory and Development Authority) अधिसूचना जारी करून 13 ऑगस्ट 2021 रोजी अधिकारी ग्रेड-ए (सहाय्यक व्यवस्थापक) पदांच्या भरतीसाठी (Jobs) अर्ज मागविले आहेत. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया तेव्हापासूनच अधिकृत संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही ते वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना pfrda.org.in ला भेट द्यावी लागेल.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

जनरल, एक्‍चुरियल, फायनान्स अँड अकाउंट्‌स, इन्फॉर्मेशन टेक्‍नोलॉजी, ऑफिशियल लॅंग्वेज आणि रिसर्च स्ट्रीम अशा एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जे उमेदवार अर्ज करू इच्छितात ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि तपशीलवार अधिसूचना तपासू शकतात. अधिसूचनेमध्ये श्रेणीनिहाय रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, इतर पात्रता आणि अर्जाशी संबंधित तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

जाणून घ्या कोण अर्ज करू शकतात...

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. पदनिहाय शैक्षणिक पात्रता, तपशील व अधिसूचनेचा संदर्भ घेऊ शकतात. 31 जुलै 2021 रोजी उमेदवार 30 वर्षांपेक्षा जास्त नसावा. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 01 ऑगस्ट 1991 रोजी किंवा नंतर झालेला असावा. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलतेची तरतूद आहे.

हेही वाचा: केंद्रीय विद्यापीठांमध्ये सहा हजारांहून अधिक शिक्षकांची होणार भरती

अशी होईल निवड...

ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची दोन टप्प्यांत निवड केली जाणार आहे. निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना तपासू शकता.

असा करा ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट pfrda.org.in ला भेट द्या. मेन पेजवर उपलब्ध न्यूज अँड इवेंट्‌स सेक्‍शनमध्ये संबंधित भरतीसाठी "अप्लाय ऑनलाइन' या लिंकवर क्‍लिक करा. आता एक नवीन पेज उघडेल. येथे नवीन नोंदणी लिंकद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सबमिट करून पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकाल.

loading image
go to top